बांदा-डिंगणे पूल वाहतुकीस धोकादायक
swt3129.jpg
81305
सावंतवाडीः जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना साईप्रसाद काणेकर. सोबत ओंकार नाडकर्णी व भाऊ वाळके.
swt3130.jpg
81306
बांदाः कालव्याच्या पुलाची उंची कमी असल्याने अपघाताची शक्यता आहे.
बांदा-डिंगणे पूल वाहतुकीस धोकादायक
ठाकरे शिवसेनाः संरक्षक रेलिंगसह डांबरीकरणाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३१ः बांदा डिंगणे (बांबरवाडी) रस्त्यावर कालव्यावर असलेल्या पुलाच्या संरक्षक भिंतीची उंची कमी असल्याने अपघाताची शक्यता आहे. त्या ठिकाणी तत्काळ संरक्षक गार्ड बसवावेत व रस्त्याचे डांबरीकरण देखील करावे, अशी मागणी बांदा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबाबत शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आज निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, या पुलावरून काही दिवसांपूर्वी ७ वर्षीय मुलगा कालव्याच्या पाण्यात पडून अपघात घडला होता. तसाच अपघात भविष्यात सुध्दा या ठिकाणी घडू शकतो. हा रस्ता बारमाही रहदारीचा आहे. त्या पुलाजवळ वळण असल्याने वाहन देखील आतमध्ये पडून अपघात घडू शकतो.
तसेच कालव्याच्या बाजूने असलेल्या रस्त्यावर १०० मीटरपर्यंत नागरीवस्ती असल्याने त्या ठिकाणी संरक्षक गार्डची अत्यंत गरज आहे. या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करणे आवश्यक आहे. संबंधित जागेची पाहणी करून त्वरित गार्ड रेलिंग बसविण्याची व्यवस्था करावी. जर भविष्यात या ठिकाणी अपघात घडून नुकसान झाल्यास जलसंपदा विभागास जबाबदार धरले जाईल, असा इशाराही ठाकरे शिवसेनेकडून देण्यात आला. यावेळी तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. निवेदन देताना ठाकरे शिवसेनेचे ओंकार नाडकर्णी, भाऊ वाळके आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.