क्राइम

क्राइम

Published on

rat३१p३४.jpg -
P२५N८१२३४
चिपळूण - अलोरे भोपाळ कॉलनी येथे दोन्ही एसटी समोरासमोर धडकल्या.

चिपळुणात दोन एसटी बसची धडक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण ः पोफळी-चिपळूण मार्गावर अलोरे येथे आज सकाळी दोन एसटी बसचा अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन एसटी समोरासमोर धडकल्यामुळे दोन्ही एसटीच्या दर्शनी बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळी ९ वाजता दापोली आगाराची एसटी पंढरपूरकडे निघाली होती तसेच चिपळूण आगाराची एसटी पोफळीहून चिपळूणकडे येत होती. दोन्ही वाहने अलोरे येथील भोपाळ कॉलनी येथील अवघड वळणावर आल्यानंतर समोरासमोर धडक झाली. या अपघाताची माहिती चिपळूण आगारात दिल्यानंतर चिपळूण आगारप्रमुख दीपक चव्हाण घटनास्थळी दाखल झाले तसेच अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली. सांयकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात सुरू होते.

---
आगवेत ३५ हजारांचे
लोखंडी साहित्य पळवले
रत्नागिरी, ः तालुक्यातील आगवे येथील कावला आंबा येथे ठेवलेले ३५ हजारांचे लोखंडी अॅंगल चोरट्याने पळवले. ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) दुपारी बाराच्या सुमारास गावचे सरपंच रमेश गुणाजी मालप यांच्या मालकीच्या जमिनीत आगवे-कावला आंबा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवाजिश फरमद अली (वय ३५, रा. जाकादेवी बाजारपेठ, रत्नागिरी मुळ ः चंदौरा सिवल मेरठ-उत्तरप्रदेश) यांनी गावचे सरपंच रमेश मालप यांच्या जागेत बीएसएनएल कंपनीचे टॉवरचे काम करत असताना कामाचे ३५ हजार रुपयांचे ९०२ किलो वजनाचे लोखंडी अॅंगल ठेवले होते. चोरट्याने ते पळवले. या प्रकरणी फिर्यादी नवाजिश अली यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
---
वाहनाच्या धडकेत
बैल ठार, वासरू जखमी
रत्नागिरी ः रत्नागिरी ते पावस रस्त्यावर फणसोप सडा येथे अज्ञात वाहनाने एका बैलाला व वासराला धडक दिली. या अपघातामध्ये बैलाचा मृत्यू झाला तर वासरू जखमी झाले आहे. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ३०) सकाळी सातच्यापूर्वी फणसोप सडा रस्त्यावर घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी ते पावस रस्त्यावर फणसोप सडा येथे अज्ञात वाहनाने निष्काळजीपणे वाहन चालवून एक बैल व वासराला धडक दिली. या अपघातात बैल ठार झाला तर वासरू जखमी झाले. या घटनेची माहिती न देता वाहनचालकांना पलायन केले. या प्रकरणी महिला पोलिस अमंलदार अर्चना मगदूम यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केले आहे.
---
कसोप येथील तरुणाचा
आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः शहरानजीकच्या कसोप-मराठवाडा येथील तरुण अचानक आजारी पडला. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अक्षय श्रीधर साळवी (वय ३५, रा. कसोप-मराठवाडा, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. ३०) सकाळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय साळवी हा घरी असताना अचानक आजारी पडला. तत्काळ नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com