पान एक-''तिलारी''च्या विकासाचे पंतप्रधानांना साकडे
नारायण राणे यांचा फोटो
६७२५६
‘तिलारी’च्या विकासाचे पंतप्रधानांना साकडे
नारायण राणेंकडून मागणी : स्वदेश दर्शन २.० योजनेत सहभाग व्हावा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३१ ः दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरण परिसराचा पर्यटन विकास करण्यासाठीचे साकडे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहे. केंद्राच्या स्वदेश दर्शन २.० योजनेतून या परिसराचा विकास करण्याची मागणी त्यांनी केली. श्री. राणे यांनी काल (ता. ३०) पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोकणविषयी विविध प्रश्न आणि मागण्या याकडे त्यांचे लक्ष वेधले.
कोकणच्या विविध विकासकामांबाबत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार राणे यांनी नुकतीच पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत तिलारी धरण परिसराचा समावेश केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेत करण्याची मागणी केली. पंतप्रधानांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती राणे यांनी दिली.
तिलारी धरण परिसर हा सुमारे २०० एकर शासकीय जमिनीवर विस्तारलेला असून, जैवविविधता, निसर्गसौंदर्य आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरण्याची मोठी क्षमता या भागात आहे. याच पार्श्वभूमीवर स्वदेश दर्शन २.० योजनेत समावेश होण्यासाठी पर्यावरणपूरक रेस्टॉरंट्स, कोकणी व मालवणी खाद्यसंस्कृतीला चालना, रिसॉर्टस्, होमस्टे, बांबू कॉटेजेससारखी निवासव्यवस्था, निसर्ग पायवाटा, सायकलिंग ट्रॅक, बोटिंग, ट्रेकिंग, स्थानिक हस्तकलेस प्रोत्साहन आदी सुविधा प्रस्तावित आहेत. तिलारी धरण परिसराचा स्वदेश दर्शन योजनेत समावेश झाल्यानंतर तिलारीसह संपूर्ण कोकणच्या पर्यटन परिसंस्थेला गती मिळेल, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि शाश्वत विकास सुनिश्चित होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
मुंबादेवीही ‘प्रसाद’मध्ये
मुंबईतील मुंबादेवी मंदिरासाठी ‘प्रसाद’ योजनेत समावेश करण्याचीही मागणी श्री. राणे यांनी केली. मुंबा देवी मंदिराला काशी विश्वनाथ धर्तीवर जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्यासाठी मंदिर परिसरातील रस्ते व परिसराचे सौंदर्यीकरण, त्या परिसरात आधुनिक सुविधा व पर्यटन केंद्र उभारणी करावी आदी मागणीचे निवेदन पंतप्रधान मोदी यांना श्री. राणे यांनी दिले. या सर्व मागण्यांना पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, केंद्र सरकारकडून यास लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा श्री. राणे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.