दोडामार्ग तालुका भाजपची नूतन कार्यकारिणी जाहीर
swt3134.jpg
81342
दोडामार्गः भाजपच्या नूतन कार्यकारिणीसोबत महेश सारंग, दीपक गवस, चेतन चव्हाण आदी.
दोडामार्ग तालुका भाजपची नूतन कार्यकारिणी जाहीर
नव्या चेहऱ्यांना संधीः ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही योग्य सन्मान
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ३१ : भाजप दोडामार्ग तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने ही कार्यकारिणी महत्त्वाची मानली जात आहे.
येथील भाजप कार्यालयात जिल्हा सरचिटणीस महेश सारंग व तालुकाध्यक्ष दीपक गवस यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात आज सायंकाळी बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण उपस्थित होते. भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. यामध्ये अनुभवी कार्यकर्त्यांसोबतच युवा नेतृत्वालाही स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तालुकास्तरावर पक्षाची धुरा अधिक सक्षमपणे पार पाडली जाईल, अशी अपेक्षा यावेळी सारंग यांनी व्यक्त केली.
नूतन कार्यकारिणी अशीः तालुका उपाध्यक्ष - आनंद तळणकर, संतोष आईर, सुनील गवस, संतोष म्हावळणकर, संध्या प्रसादी, आकांशा शेटकर. सरचिटणीस - सिद्धेश पांगम, संजय सातार्डेकर. चिटणीस - सूर्यकांत धर्णे, संतोष नाईक, कल्पना बुडकुले, वैभव सुतार, क्रांती जाधव, स्वाती गावकर. कोषाध्यक्ष स्वप्नील गवस, सदस्यपदी प्रकाश कदम (अनुसूचित जाती व जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष), दीक्षा महालकर (महिला तालुकाध्यक्ष), पराशर सावंत (युवा मोर्चा तालुकाध्यक्ष), मोहन देसाई (किसान मोर्चा तालुकाध्यक्ष), अंकुश नाईक (ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष), नितीन मणेरीकर, रामचंद्र मणेरीकर, प्रकाश सावंत, सुधीर पनवेलकर, देविदास गवस, विशाल मणेरीकर, सोनल म्हावळणकर, रवी जंगले, धाकू कुंभार, संजय उसपकर, संजय मळीक, शैलेश बोर्डेकर, श्रुती देसाई, सुमित म्हाडगुत, प्रथमेश मणेरीकर, सुनील गवस, विवेक सुतार, साक्षी देसाई, प्राची परब, लक्ष्मण गावडे, सूर्याजी झेंडे, चंद्रकांत खडपकर, चंद्रकांत गवस, प्रशांत गवस, गणेश बेळेकर, मानसी गवस, अजित मुरगुडी, सुषमा सावंत, शाबी तुळसकर, जान्हवी देसाई, आरती कांबळी, गुणवंती कदम, शुभलक्ष्मी देसाई, विद्या भावे, सुमित म्हाडगुत, करुणा दळवी, हसीना शेख, रुक्मिणी नाईक, भाग्यलक्ष्मी कळणेकर, अंजू गवस, दिनेश नाईक, कृष्णा शिरोडकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.