अखंड हरिनाम सप्ताहास कणकवली येथे सुरुवात
81358
अखंड हरिनाम सप्ताहास
कणकवली येथे सुरुवात
कणकवली, ता.१ ः शहरातील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाला गुरुवारी प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रात घटस्थापना झाली. त्यानंतर गाऱ्हाणे करून विठ्ठल नामाच्या अभंगांनी, टाळघोषात भाविकांनी रिंगण करत जयघोष केला. या सप्ताह निमित्त मंदिर परिसर विविध फुलांच्या सहाय्याने सजविले आहे. तसेच मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली आहे.
सप्तहाच्या पहिल्या दिवशी तेलीआळी मित्र मंडळ यांनी देखावा काढत हा दिवस जागवला. उद्या (ता.२) पटकीदेवी मित्रमंडळ, ३ आॅगस्ट रोजी ढालकाठी मित्रमंडळ, ४ रोजी जुना मोटर स्टॅण्ड मारुतीआळी मित्रमंडळ, ५ रोजी बिजलीनगर मित्रमंडळ, ६ ऑगस्ट आंबेआळी मित्रमंडळांचे चित्रदेखावे आणि दिंडी निघणार आहेत. शिवाय मंदिरात अहोरात्र भजने आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी प्रदक्षिणा व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.