ओसरगांव येथे शेतकऱ्यांना 
रोटरीतर्फे आज मोफत रोपे

ओसरगांव येथे शेतकऱ्यांना रोटरीतर्फे आज मोफत रोपे

Published on

ओसरगांव येथे शेतकऱ्यांना
रोटरीतर्फे आज मोफत रोपे

कणकवली, ता. १ ः ओसरगाव येथील शेतकऱ्यांना रोटरी क्‍लबतर्फे उद्या (ता.२) मोफत रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. बंगळूरू येथील उद्योगपती रविशंकर डाकोजू यांच्या सहकार्यातून रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ओसरगाव गवळवाडी येथील विष्णु विठ्ठल आंगणे (संजना आंगणे - पोलिसपाटील) यांच्या घरी नारळ, आंबा, काजू, सुपारी, चिकू, रतांबा आदी सुमारे १ हजार फळझाडे यावेळी मोफत वाटली जाणार आहे. यात प्रत्येक शेतकऱ्यांना किमान ३ रोपे किंवा कलमे देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला बंगळूरू येथील उद्योगपती रविशंकर डाकोजू, ‘रोटरी’चे अध्यक्ष अरुण मालणकर, सेक्रेटरी दीपक आळवे, प्रथमेश सावंत, डॉ. प्रशांत कोलते, सचिन मदने, रोटरी क्लब सिंधुदुर्गचे सेक्रेटरी प्रणय तेली, डॉ. विद्याधर तायशेट्ये, गजानन कांदळगावकर, सरपंच सुप्रिया कदम, उपसरपंच गुरुदास सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com