कोकण
शिंदे शिवसेना वायरी भूतनाथ उपविभाग प्रमुखपदी चोपडेकर
N81423
शिंदे शिवसेना वायरी भूतनाथ
उपविभाग प्रमुखपदी चोपडेकर
मालवण, ता. १ ः शिंदे शिवसेनेच्या वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघ उपविभाग प्रमुख पदी दत्तात्रय चोपडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते श्री. चोपडेकर यांना सुपूर्द करण्यात आले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संजय आंग्रे, दीपक पाटकर, मंदार लुडबे, महेश सारंग, बाळू नाटेकर, संदीप भोजने आदी उपस्थित होते.