-चिखलीत सर्पमित्रांकडून दोन अजगरांना जीवदान

-चिखलीत सर्पमित्रांकडून दोन अजगरांना जीवदान

Published on

-rat1p8.jpg-
25N81404
संगमेश्वर ः रांगवमध्ये अजगराला पकडताना सर्पमित्र.
------------
चिखलीतील सर्पमित्रांकडून
दोन अजगरांना जीवदान
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ ः रांगव गावात अजगराला जीवदान देण्याचे काम चिखलीतील तरुण सर्पमित्रांनी केले. चिखली गावातील अक्षय मोहिते व सम्यक पवार हे दोघेजण आजूबाजूच्या गावात कोणाच्या घरी साप आल्यास त्वरित मदतीला धावून जाण्याचे काम करतात. चिखलीतील रिक्षाचालक सुशील जाधव यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात अजगर घुसला होता. जाधव सकाळी कोंबड्यांना उघडायला गेले असताना त्यांना एक कोंबडी मेलेली दिसून आली तसेच त्यांना आतमध्ये अजगर दिसून आला. सर्पमित्रांनी त्या अजगराला पकडले.
रांगव येथील कीर्तनकार हरिबुवा तुळसणकर यांच्या घरामागील खोपटीत अजगर घुसला होता. त्यांनी या सर्पमित्रांना बोलावले. दोघांनी एका तासाच्या प्रयत्नानंतर अजगराला पकडले. त्यांच्यासोबत आदर्श मोहिते, अभी मोहिते, आयुष पवार हे मित्र मदतीसाठी होते. अजगराला पकडून त्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

Marathi News Esakal
www.esakal.com