
मुक्त विद्यालय प्रवेश
१४ पर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी, ता. १ ः महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ यांनी प्राथमिक स्तर (इ. ५ वी) आणि उच्च प्राथमिक स्तर (इ. आठवी) परीक्षेसाठी नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नावनोंदणी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचा आहे. अर्ज भरण्याबाबत आवश्यक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सचिव, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे प्रमोद गोफणे यांनी केले आहे. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑनलाइन नावनोंदणी अर्ज भरण्याची मुदत १४ ऑगस्टपर्यंत आहे. मूळ अर्ज आणि कागदपत्रे संपर्क केंद्रात जमा करण्याची मुदत १९ ते २९ ऑगस्ट आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला मूळ अर्ज, विहित शुल्क आणि मूळ कागदपत्रांसह नमूद केलेल्या संपर्क केंद्रात जमा करणे आवश्यक आहे.