ःस्मार्ट वीज मिटरचा निर्णय रद्द करण्यास भाग पाडणार
-RATCHL११.JPG -
२५N८१४८५
चिपळूण ः कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देताना काँग्रेसचे पदाधिकारी.
-----
स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू
लियाकत शाह ः चिपळूण महावितरणवर काँग्रेसची धडक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत याशिवाय ग्राहकांची संमती नसतानाही जबरदस्तीने महावितरणकडून स्मार्ट वीजमीटर बसवण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी चिपळूण तालुका काँग्रेसने महावितरणवर धडक देत जाब विचारला. लोकांच्या विरोधामुळे स्मार्ट वीजमीटर बसवू नयेत, त्याला आमचा विरोध आहे. सरकारला स्मार्ट वीजमीटरचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू, असा इशारा तालुका काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.
महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याशी चर्चा करताना तालुकाध्यक्ष शाह व पदाधिकारी म्हणाले, कोकणात वीजचोरी व थकबाकी प्रमाण फार कमी आहे. शहरात अंडरग्राऊंड विद्युतवाहिन्या करण्याची आवश्यकता आहे. दिवसातून वारंवार विद्युत्पुरवठा खंडित होतो. यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाराऱ्यांवर मोठा परिणाम होत आहे. नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर लादण्याचा प्रकार सुरू आहे. पूर्वी सर्वसामान्य जनतेकडून मीटर बसवण्यासाठी हजारो रुपयांच्या स्वरूपात अनामत रक्कम जमा करून घेतल्या आहेत. जे मीटर बसवण्यात आले आहेत त्याचे वीजबिल अमाप स्वरूपात येत आहे. शासनाचे इतर कर व युनिटदर भरमसाठ वाढल्याने सर्वसामान्य जनतेला लाईटबिल भरताना नाकीनऊ येते. या विषयी अनेक तक्रारी जनतेकडून येत आहेत. यावर कार्यकारी अभियंता धनंजय भांबरे म्हणाले, स्मार्ट वीजमीटर बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू आहे. लोकांच्या भावना वरिष्ठांकडे पोहोचवल्या जातील. नवीन मीटर बसवल्यानंतर जिथे नागरिकांच्या शंका आहेत तेथे त्वरित दोन्ही मीटर बसवून शकांचे निरसन करत आहोत. अनियमित वीजपुरवठ्याचा शोध घेतला जाईल. यात कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू.
या वेळी महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, माजी नगरसेवक कबीर काद्री, रफीक मोडक, इम्तियाज कडू, संजय जाधव, संतोष सावंत-देसाई, महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, शहराध्यक्षा लिना जावकर, सफा गोठे, अनिल रेपाळ, नंदू कामत, यशवंत फके, दादा आखाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
---
मीटर लादणे खेदजनक
राज्यातील अनेक विभागात स्मार्ट मीटरला विरोध होत असल्याने त्या त्या ठिकाणी ही योजना स्थगित करावी लागली आहे. तरीही तालुक्यात महावितरणकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता व पारदर्शक माहिती न देता नागरिकांवर हे स्मार्ट मीटर लादले जात असून ते खेदजनक असल्याचे लियाकत शाह यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.