कोकण
जुगू यमकर यांचे निधन
81533
जुगू यमकर यांचे निधन
आंबोली, ता. १ ः येथील आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध जुगू यमकर (वय १०५) यांचे आज पहाटे निधन झाले. अनेक वर्षे त्यांनी आयुर्वेदिक वैद्य म्हणून काम केले. अनेक रुग्णांना त्यांच्या औषधामुळे गुण मिळत असल्याने गोवा, मुंबई, पुणे, बेळगाव, गडहिंग्लज येथून लोक त्यांच्याकडे यायचे. अगदी परदेशात देखील त्यांचे औषध पोचले होते. गोव्याचे तत्कालीन मंत्री रमाकांत खलप, आमदार दीपक केसरकर तसेच अनेक राजकीय मंडळी अधिकारी असे अनेक हस्ती देखील त्यांच्याकडे भेट देऊन गेल्या आहेत. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.