श्रावणी, आकांक्षा, मयुरी नाईक प्रथम
81659
श्रावणी, आकांक्षा, मयुरी नाईक प्रथम
शालेय वक्तृत्व स्पर्धा; कलंबिस्त हायस्कूल, ‘दिशा’चा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २ ः दिशा फाउंडेशन व कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पहिली ते चौथी गटात सांगेली घोलेवाडीची श्रावणी राणे, पाचवी ते सातवी गटात शिरशिंगे क्र.१ ची आकांक्षा धोंड तर आठवी ते दहावी गटात सांगेली हायस्कूलची मयुरी नाईक प्रथम आली.
कलंबिस्त प्रशालेत वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य भरत गावडे व प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजित जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी परीक्षक महेश पेडणेकर आदी उपस्थित होते. तिन्ही गटांत मिळून या स्पर्धेत ५० विद्यार्थी सहभागी झाले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून भरत गावडे, श्री. पेडणेकर, किशोर वालावलकर यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण समारंभावेळी दिशा फाउंडेशनच्या स्थापनेच्या उद्देशाबाबत सचिव दीपक राऊळ यांनी माहिती दिली. कलंबिस्त प्रशालेतील १९९३-९४ दहावीच्या बॅचने समाजातील दुर्बल, गरजू व अनाथ घटकांसाठी सेवाभावी काम करण्याच्या हेतूने २०२३ मध्ये दिशा फाउंडेशनची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू लोकांना मदतकार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. पारितोषिक वितरण कार्यक्रमात दीपक राऊळ व फाउंडेशनचे उपाध्यक्ष अनिल राऊळ, प्रवीण कुडतरकर, सहसचिव विनिता कविटकर, कल्पना सावंत, राजू गोवेकर आदींसह मुख्याध्यापक जाधव, भरत गावडे आदी उपस्थित होते.
उर्वरित निकाल असा ः पहिली ते चौथी गट- द्वितीय अन्वी राऊळ (शिरशिंगे क्र. १), तृतीय वेद बिड्ये (वेर्ले क्र. ३), उत्तेजनार्थ अर्णवी सनाम (सांगेली सनामटेंब). पाचवी ते सातवी-द्वितीय सार्था बिड्ये (वेर्ले क्र. १), तृतीय अन्वी देसाई (शिरशिंगे क्र. १), उत्तेजनार्थ गतिक जंगले (सांगेली हायस्कूल). आठवी ते दहावी गट-द्वितीय अक्षरा राऊळ (शिरशिंगे हायस्कूल), तृतीय माधुरी राऊळ (कलंबिस्त हायस्कूल), उत्तेजनार्थ शमिका धर्णे (सांगेली हायस्कूल).