जिल्हास्तर जिम्नॅस्टिक स्पर्धांचा निकाल जाहीर

जिल्हास्तर जिम्नॅस्टिक 
स्पर्धांचा निकाल जाहीर
Published on

जिल्हास्तर जिम्नॅस्टिक
स्पर्धांचा निकाल जाहीर
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक क्रीडा स्पर्धा शुक्रवारी (ता. १) जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे झाल्या. या स्पर्धेचा निकाल असा ः जिम्नॅस्टिक १४ वर्षांखालील मुले (आर्टिस्टिक) : सुशोभन सावंत, शार्दुल शिर्के, युवराज परब. १४ वर्षांखालील मुली (आर्टिस्टिक)-झोया शेख, हर्षिता पाटकर, तृतीय आफ्शिन शेख. १४ वर्षांखालील मुली (रिदमिक)-सई केळुसकर, मालविका दळवी, सुमेधा गावडे. १७ वर्षांखालील मुले (आर्टिस्टिक)-नहुश जाधव, मुकुंद सावंत, रोहित गावडे. १७ वर्षांखालील मुली (आर्टिस्टिक)-शिवानी कामत, श्रेया निवळे, प्रणाली कोटेकर. १७ वर्षाखालील मुली (रिदमिक)- हालिमाबी खान, आयुषी सावंत, दीप्ती राऊत. याप्रमाणे जिम्नॅस्टिक स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली.
---------------------
संस्था पुरस्कारांसाठी
१८ पर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी सहकार पुरस्कार २०२३-२४ साठीचे प्रस्ताव सादर करण्यास १८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. जिल्ह्यातील जास्ती जास्त सहकारी संस्थांनी सहकार पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक सुजय कदम यांनी केले आहे. ज्या सहकारी संस्थांना प्रस्ताव सादर करण्याचे असतील, त्यांनी ज्या तालुक्यात त्यांचे मुख्यालय आहे, त्या तालुक्यातील तालुका सहाय्यक निबंधक यांच्याकडे १८ ऑगस्टपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. प्रस्ताव तालुका कार्यालयांकडून छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करण्याची मुदत १९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यांनतर वरिष्ठ कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात येतील, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
--------------------
अनुदानित खतांची विक्री
‘ई-पॉस’द्वारे बंधनकारक
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांनी अनुदानित रासायनिक खतांची विक्री ही ई-पॉस प्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे. ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन एल१ सिक्युरिटी ई-पॉस मशीन प्राप्त केले नाहीत, त्यांनी कृषी विकास अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधून १० ऑगस्टपूर्वी ई-पॉस मशीन प्राप्त करून कार्यान्वित करुन घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे. खत विक्रीच्या नोंदी तत्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. ज्या विक्रेत्यांकडे ई पॉसवरील खत साठा व प्रत्यक्ष साठा यामध्ये फरक आढळेल, अशा विक्रेत्यांच्या परवान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
-----------------
शासन योजनेबाबत
नागरिकांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्हा ठिकाणातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील (भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाज वगळून) उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. योजनेसाठी विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील बीए/बीकॉम/बी.एस.सी. अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए/एम.एस.सी. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्याक्रमध्ये शिक्षण घेणाऱ्या (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विदयार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने १७ ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे जमा करावयाचे आहे.
......................
‘स्वयंम’ योजनेसाठी
अर्ज सादर करा’
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा ठिकाणातील वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विषेश मागास प्रवर्गातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे. योजनेसाठी विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेषमागास प्रवर्गातील बीए/बीकॉम/बी.एस.सी. अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए/एम.एस.सी. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर अभ्याक्रमध्ये शिक्षण घेणाऱ्या (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन पध्दतीने १७ ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत. भरलेल्या अर्जाची एक प्रत सहायक सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग यांच्याकडे जमा करावयाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com