कोकण
जयेश माधव यांना ‘साहित्य रत्न’ जाहीर
81661
जयेश माधव यांना
‘साहित्य रत्न’ जाहीर
बांदा, ता. २ ः मुंबई येथील ‘आम्ही मुंबईकर’तर्फे देण्यात येणारे यंदाचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात पाडलोस (ता. सावंतवाडी) येथील जयेश माधव यांना ‘सांस्कृतिक व साहित्य रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जयेश माधव यांचे सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार घोषित झाला. प्रमोद सूर्यवंशी व वसुधा नाईक यांनी याबाबतची माहिती दिली. माधव यांचे सिंधुदुर्गात अभिनंदन होत आहे.