सदर ः त्सुनामीची तीव्रता कमी होऊ शकते का...!
वसा वसुंधरा रक्षणाचा.....लोगो
rat3p6.jpg-
81830
प्रशांत परांजपे
इंट्रो
समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडिते। विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे॥ हा श्लोक, पृथ्वीला देवी मानून, तिच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि तिच्या ठिकाणी केलेल्या चूकांची क्षमा मागतो. परिस्थितीचा बदलणे हा नियम आहे .तो कधी आनंददायी असतो तर कधी अत्यंत भीतीदायक आणि क्लेशदायी असतो. मात्र या दोन्ही स्थितीमध्ये ठामपणे उभ राहण्यासाठी आपल्याला प्रश्नाच्या डोक्यावर उभे रहाणे अत्यावश्यक आहे आणि संयम बाळगून पर्यावरण संवर्धन क्षणाक्षणाला करणे काळाची नितांत गरज निर्माण झाली आहे.
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली.
त्सुनामीची तीव्रता कमी होऊ शकते का...!
नुकत्याच येऊन गेलेल्या भयंकर अशा भूकंप आणि त्सुनामीच्या धडकी भरणाऱ्या घटनेनंतर आता मोठा श्वास घेणे आवश्यक आहे. रशियामध्ये झालेल्या या मोठ्या भूकंपानंतर सर्वत्र हाहाःकार माजला. या भूकंपानंतर त्सुनामी लाटा हिंदी महासागरात प्रचंड मोठ्या प्रमाणात उसळून आल्या. वातावरणातील बदल हा सातत्याने होत असतो या वातावरणातल्या बदलाला सामोरे जाण्याकरता मानसिक खंबीरता आणि नैसर्गिक साधन संपत्तीची जोपासना या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यासाठीच त्सुनामी येते म्हणजे नक्की काय होतं आणि आल्यानंतर कशा पद्धतीचा संहार करते आणि याची तीव्रता कमी करण्यासाठी तिच्यापासून भूपृष्ठाचा आणि मानवाचा बचाव करण्याकरता, किंबहुना येणारे संकट कमी गडद कसे होईल या दृष्टीने काय करणे आवश्यक आहे याबाबतीत आजच्या या लेखात आपण ऊहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने आता पर्यावरण संवर्धनाच्या गोष्टीत खारीचा नाही.... तर मोलाचा वाटा उचलणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
आज रशियात जोरदार धक्का मिळाला सुमारे १२ देशांना याचा फटका बसला आपणही आता यानंतर येणाऱ्या महासंहाराच्या हिटलिस्टवर आहोत आणि म्हणूनच सावध पुढच्या हाका......या ओळीचा अर्थ असा आहे की, "येणाऱ्या परिस्थितीसाठी किंवा बदलांसाठी तयार रहा, जागरूक रहा".
तुतारी ही कविता केशवसुत यांनी १८९०-१९०० च्या दरम्यान लिहिली. या कवितेतून त्यांनी सावधतेचा इशारा दिला आहे आज सुमारे एकशे पंचवीस वर्षांनी त्याची प्रचिती येते आहे. त्सुनामी (जपानी: 津波 ; रोमन लिपी: Tsunami) म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. त्सुनामी हा जपानी शब्द असून त्याचा अर्थ "बंदरातील लाटा" ( त्सु 津- बंदर, नामी 波 - लाटा ) असा आहे. हा शब्द कोळी बांधवांत प्रचलीत होता. मासेमारी करून परत आलेल्या कोळ्यांना संपूर्ण बंदर नाश पावलेले दिसे, पण समुद्रात लाटा दिसत नसत. त्यामुळे हे नाव देण्यात आले, अशी माहिती उपलब्ध आहे.
किनाऱ्यापासून दूर समुद्रात या लाटांची उंची जास्त नसते पण तरंग लांबी जास्त असते. त्यामुळे त्या दिसून येत नाहीत. परंतु जेव्हा या लाटा किनाऱ्याला धडकतात त्यावेळी त्यांची उंची वाढते आणि तरंगलांबी कमी होते, त्यामुळे पाण्यातील शक्ती किनाऱ्यावर आदळून नुकसान होते. खोल समुद्रामध्ये त्सुनामीची तरंगलांबी सुमारे २०० कि.मी. व तरंग उंची सुमारे १ मीटर असते. त्यावेळी वेग साधारण ताशी ८०० कि.मी. असतो. त्सुनामी किनाऱ्याला धडकताना त्यांचा वेग व ताकद वाढते व धडक देते आणि नुकसान घडते. २०२५ मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे मोठे नुकसान झाले. रशियातील कामचटका येथे ८.८ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे प्रशांत महासागरात त्सुनामी आली. जपान आणि अमेरिकेच्या किनाऱ्यालाही त्सुनामीचा धोका निर्माण झाला होता. जपानमध्ये काही ठिकाणी १ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या त्सुनामी लाटाही पाहायला मिळाल्या. रशियामध्ये भूकंपाचे केंद्रस्थान असल्याने तेथे जास्त नुकसान झाले, ज्यात इमारतींचे नुकसान आणि वीजपुरवठा खंडित झाला होता. त्सुनामी पासून भूपृष्ठाचे रक्षण करण्यासाठी खारफुटीच्या जंगलांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.
त्सुनामीपासून भूपृष्ठाचे संरक्षण करण्यासाठी, काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. यात भूभागाचे संरक्षण, इमारतींचे बांधकाम आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे यांचा समावेश होतो.
* भूपृष्ठाचे संरक्षण ः समुद्रकिनारी वनस्पती उंच आणि मजबूत वनस्पती, जसे की खारफुटीचे (mangrove) जंगल, त्सुनामीच्या लाटांचा वेग कमी करण्यासाठी आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
* प्रवाळ (Coral) खडक ः प्रवाळ खडक नैसर्गिकरित्या किनारपट्टीचे संरक्षण करतात आणि त्सुनामीच्या लाटांचा जोर कमी करतात.
* नैसर्गिक तटबंदी ः नैसर्गिकरित्या तयार झालेल्या उंचवट्यांचा आणि डोंगरांचा उपयोग त्सुनामीच्या लाटांपासून संरक्षणासाठी केला जाऊ शकतो.
* समुद्रकिनारी बांधकामे ः समुद्रकिनारी बांधकामे करताना, ती त्सुनामीच्या लाटांचा प्रतिकार करू शकतील अशा पद्धतीने करावी लागतात.
* इमारतींचे संरक्षण ः उंच ठिकाणी बांधकामे:इमारती समुद्रसपाटीपासून पुरेशी उंचीवर बांधाव्यात, जेणेकरून त्सुनामीच्या लाटांमुळे होणारे नुकसान कमी होईल.
* भूकंप-प्रतिरोधक बांधकाम ः इमारतींचे बांधकाम भूकंप-प्रतिरोधक असावे, जेणेकरून भूकंपांमुळे येणाऱ्या त्सुनामीच्या लाटांचा इमारतींवर कमी परिणाम होईल.
* सुरक्षित स्थलांतर योजना - इमारतींमध्ये सुरक्षित स्थलांतरण मार्ग आणि सूचना फलक असावेत, जेणेकरून लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास मदत होईल.
* खारफुटीची वने व प्रवाळ बेटे तसेच कांदळवन नैसर्गिकरित्या त्सुनामीच्या तडाख्यांपासून भूपृष्ठाचे संरक्षण करतात.
त्सुनामी (Tsunami) म्हणजे समुद्राच्या पाण्यात मोठी लाट येणे. ही लाट प्रामुख्याने भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे निर्माण होते. जेव्हा पाण्याच्या खाली प्रचंड ऊर्जा बाहेर पडते, तेव्हा पाण्याचे मोठे विस्थापन होते आणि त्यामुळे त्सुनामी लाटा तयार होतात.
- त्सुनामी येण्याची कारणे:
* भूकंप ः समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास, जमिनीचा मोठा भाग अचानक वर किंवा खाली सरकतो. यामुळे पाण्याच्या मोठ्या प्रमाणात विस्थापन होऊन त्सुनामी लाटा उसळतात.
* ज्वालामुखीचा उद्रेक ः पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास, लाव्हा बाहेर येतो आणि त्यामुळे प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. या ऊर्जेमुळे पाणी होते आणि त्सुनामी लाटा निर्माण होतात.
* भूस्खलन ः समुद्राच्या आत किंवा समुद्राच्या कडेला भूस्खलन झाल्यास, माती आणि खडक पाण्यामध्ये वेगाने सरकतात, ज्यामुळे पाण्याच्या विस्थापनामुळे त्सुनामी लाटा तयार होतात.
- त्सुनामी लाटांची वैशिष्ट्ये
* त्सुनामी लाटांची उंची उघड्या समुद्रात कमी असली तरी, ती किनाऱ्याजवळ येताच प्रचंड वाढते.
* त्सुनामी लाटांचा वेग खूप जास्त असतो, जो ताशी ४० ते २०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो.
* त्सुनामी लाटांमुळे किनारी भागांमध्ये मोठे नुकसान होऊ शकते, कारण त्यांची उंची आणि वेग खूप जास्त असतो.
* त्सुनामी लाटांची लांबी (तरंगलांबी) खूप जास्त असते, त्यामुळे किनाऱ्यावर येईपर्यंत त्या समुद्रात फारशा लक्षात येत नाहीत.
एकंदरीतच निसर्गाच्या पुढे आपण सदा नतमस्तक होणे अत्यावश्यक असून त्याकरता रोज नित्य नियमाने सकाळी उठल्यानंतर या भूमीला वंदन करून आणि निसर्ग संवर्धनासाठी स्वतःला सर्व नियम आणि अटी लागू करून घेणे काळाची गरज आहे.
(लेखक शाश्वत पर्यावरण विकास या विषयातील मानद डॉक्टरेट पदवीधर आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.