‘रांगणी तुळसुली’ची विकासाकडे झेप

‘रांगणी तुळसुली’ची विकासाकडे झेप

Published on

81845

‘रांगणी तुळसुली’ची विकासाकडे झेप

आमदार नीलेश राणे; ‘स्मार्ट ग्राम’ निवडीबाबत सत्कार सोहळा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः विकासाच्या नकाशावर असणाऱ्या ग्रामीण भागातील रांगणा तुळसुली गावाने शासनाचे मिळविलेले विविध पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भूषणावह आहेत. या गावाने विकासाकडे झेप घ्यावी. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांनी केले. ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारुरची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतीचा सत्कार सत्कार सोहळा दिमाखात पार पडला.
यानिमित्त ग्रामपंचायतीचा सत्कार व श्री सत्यनारायण महापूजा तसेच रांगणा तुळसुली कदमवाडी शाळा वर्गखोली इमारतीच्या उद्‍घाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम श्री देवी भावई मंदिर रांगणा तुळसुली येथे आमदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हा प्रमुख दीप्ती पडते, तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर, माजी सभापती नूतन आईर, माजी सरपंच कान्हू शेळके, पावशी ग्रामपंचायत सरपंच वैशाली पावसकर, ग्रामसेवक श्रद्धा आडेलकर, सुभाष तुळसुलकर, वामन गोडे, राजू शेळके, जयश्री कोळेकर, सुधाकर सावंत, विनोद गोडे, विलास चव्हाण, रांगणा तुळसुली शाळा मुख्याध्यापक राजन कोरगावकर, कदमवाडी शाळा मुख्याध्यापक राजेश गुरव, अंगणवाडी सेविका शिवांगी पावसकर, प्रियांका चव्हाण, कृष्णा पालव आदी उपस्थित होते.

आमदार राणे म्हणाले, ‘‘रांगणा तुळसुली सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांचे गावाच्या विकासात असणारे योगदान उल्लेखनीय आहे. म्हणूनच हा गाव शासनाच्या विविध योजनांचा मानकरी ठरला आहे. सरपंच नागेश आईर यांची गेली कित्येक वर्षे गावाच्या विकासासाठी असणारी धडपड वाखाणण्याजोगी आहे. कुडाळ तालुक्यातील हा ग्रामीण भाग कित्येक वर्षांपासून विकासाच्या प्रक्रियेत वावरत आहे. या भागाचा आमदार म्हणून येथील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल.’’ सरपंच आईर यांनी महाराष्ट्र राज्य सरपंच संघ यांनी ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारुरला आदर्श सरपंच पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित केल्याचे सांगत हे यश सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे सांगितले.
.....................
आमदार राणेंकडून सरपंचांचे कौतुक
सरपंच आईर हे सर्वांना सोबत घेऊन करत असणारे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. गावासाठी अशा प्रकारचा झटणारा सरपंच जिल्ह्यात प्रथमच पाहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने अनेक पुरस्कार मिळविले. ग्रामपंचायत प्रशासन कसे हाताळायचे, हे अनेकांना समजले नाही, ते या गावाला कळले आहे. जिल्ह्यातील आदर्शवत गाव म्हणून निश्चितच मला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार आमदार राणे यांनी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com