चर्मकार समाजाचे प्रश्न लवकरच मार्गी

चर्मकार समाजाचे प्रश्न लवकरच मार्गी

Published on

81941


चर्मकार समाजाचे प्रश्न लवकरच मार्गी

जिल्हाध्यक्ष सुजित जाधव ः कुडाळात विद्यार्थ्यांचा गौरव, मान्यवरांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः संत रोहिदास भवनासह आपल्या समाजाचे चे मूलभूत प्रश्न, समस्या आहेत त्या प्राधान्याने सोडवण्यासाठी पालकमंत्री नीतेश राणे, समाजाचे जिल्हा मंडळ आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे प्रतिपादन जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात केले. जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग तालुका कुडाळ शाखा यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव तसेच समाजातील निवृत्त, विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्याचा सत्कार सोहळा आज येथील मराठा समाज हॉलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
याचे उद्‌घाटन कार्यक्रमाचे कुडाळ तालुका शाखाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर पंचायत समितीचे माजी गटविकास अधिकारी नामदेव पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सेन्सॉर बोर्ड सदस्य रंगकर्मी विजय चव्हाण, मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हा प्रवक्ता के. टी. चव्हाण, प्रकाश चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष मनोहर सरमळकर, भवन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण, नायब तहसीलदार प्रदीप पवार, रामदास चव्हाण, सुभाष बांबुळकर, प्रिया आजगावकर, अॅड. राजीव कुडाळकर, कावेरी चव्हाण, राजन वालावलकर, सुरेश पवार, मधुकर जाधव, मधुकर चव्हाण, प्रा. नितीन बांबर्डेकर, सचिव नरेंद्रकुमार चव्हाण, कोषाध्यक्ष गुरुनाथ तेंडुलकर, प्रमोद आजगावकर, मनीषा पाताडे, गणपत चव्हाण, राजेश चव्हाण, सुरेश पिंगुळकर, रमेश कुडाळकर, बी. बी. चव्हाण आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्‍घाटक नामदेव पवार यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा आपल्या समाजातील मुलांना प्रोत्साहन देण्याचा कौटुंबिक उत्सव सोहळा आहे. त्यांच्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप भविष्यात त्यांच्यासाठी फलश्रुतीदायी ठरणार आहे. २०२६ चा जो विद्यार्थी गुणगौरव सोहळा होणार आहे, त्यामध्ये दहावी-बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देईन, असे जाहीर केले. प्रास्ताविकात सचिव चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा त्यांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारता यावी, त्यांना भविष्यात वाटचाल करताना प्रोत्साहन मिळावे यासाठी गेली कित्येक वर्ष राबवला जात आहे, असे सांगितले.
यावेळी नवीन टीमचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका चर्मकार समाजातील २०२५ मध्ये शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा उत्तीर्ण, दहावी, बारावी पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच निवृत्त अधिकारी, उल्लेखनीय कामगिरी केलेले व विविध समित्या संस्थावर निवड झालेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव राजेश चव्हाण यांनी आभार मानले.
----
‘रोहिदास भवन इमारत पूर्ण करू’
जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, ‘‘पालकमंत्री राणे यांच्या माध्यमातून रोहिदास भवनसाठी २५ लाख रुपये मंजूर आहेत. येणाऱ्या दोन वर्षांत ही इमारत दोन मजली होणार आहे. आपल्या समाजाच्या प्रत्येक गावात स्मशानशेड तसेच इतर जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून चर्मकार समाज जिल्हा मंडळाची पालकमंत्री राणे व अधिकारी वर्गासोबत बैठक घेतली जाणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com