मालवणात १७ ऑगस्टला चर्चासत्र
82105
जयवंत दळवींच्या साहित्यावर होणार उहापोह
प्रवीण बांदेकर ः मालवणात १७ रोजी चर्चासत्राचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : कोकणातील ज्येष्ठ लेखक (कै.) जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत त्यांच्या जीवन व कार्याला उजाळा देण्यासाठी येथील बॅ. नाथ पै सेवांगण व साहित्य अकादमी दिल्ली यांच्या वतीने १७ ऑगस्टला सेवांगण येथे जयवंत दळवींच्या समग्र साहित्याची चर्चा करणारे एक दिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे, अशी माहिती साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील बॅ नाथ पै सेवांगण येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, ॲड. संदीप निंबाळकर, शैलेश खांडाळेकर, प्रवीण बांदेकर, महेश केळुसकर, ज्योती तोरसकर, सुधाकर मातोंडकर आदी उपस्थित होते.
हे वर्ष कोकणातील ज्येष्ठ लेखक (कै.) जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आरवली (ता. वेंगुर्ले) या गावचे सुपुत्र असलेले जयवंत दळवी हे मराठी साहित्यात कथा, कादंबरी, नाटक, विनोदी लेखन अशा विविध अंगी लेखन प्रकारातून मौलिक भर घालणारे चतुरस्त्र साहित्यिक होते. त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्याच्या हेतूने हे चर्चासत्र आयोजित केले आहे, अशी माहिती बांदेकर यांनी दिली. हे चर्चासत्र सर्वांसाठी नि:शुल्क आहे. १७ ऑगस्टला सकाळी १० वाजता उद्घाटन होणार आहे. चर्चासत्रात साहित्य अकादमीचे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील, सचिव के. श्रीनिवासराव, बॅ नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, जयवंत दळवी यांचे पुत्र गिरीश दळवी, साहित्य अकादमी विभागीय कार्यालय मुंबईचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर उपस्थित राहणार आहेत. प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांदेकर यांचे बीज भाषण होणार आहे.
---
वक्ते व विषय असे....
पहिल्या सत्रात महेश केळुसकर हे ‘जयवंत दळवींचे व्यक्तिमत्व आणि साहित्यनिष्ठा’, शरयू असोलकर ‘दळवींच्या साहित्यातील कोकण’, संजय कळमकर ‘दळवींच्या कादंबऱ्या’, गोविंद काजरेकर ‘दळवींचे कथा साहित्य’ यावर बोलणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रेमानंद गज्वी ‘जयवंत दळवींचे नाटक’, वामन पंडित ‘हास्य लेखन’, श्रीकांत बोजेवार ‘चित्रपटातील योगदान’ यावर बोलणार आहेत. या चर्चासत्राच्या निमित्ताने साहित्य अकादमीच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री आयोजित केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.