बांदा-सटमटवाडीच्या समस्या सोडवा

बांदा-सटमटवाडीच्या समस्या सोडवा

Published on

81972

बांदा-सटमटवाडीच्या समस्या सोडवा

सरपंचांना निवेदन; १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३ ः वेळोवेळी लक्ष वेधून तसेच निवेदने देऊनही बांदा सटमटवाडीतील कामांची पूर्तता अद्याप न केल्याने १५ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा सटमटवाडीवासीयांनी दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी सरपंच प्रियांका नाईक यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘सटमटवाडीतील समस्यांबाबत एप्रिल २०२५ मध्ये ग्रामपंचायतीला निवेदन दिले होते. सटमटवाडीतील बोगदा व चारही बाजूचा पर्यायी मार्ग पूर्ण होण्याबाबत तसेच जलजीवन पाईपलाईन ठिकठिकाणी लिकेज होत असल्याने शाळेतील मुलांना तसेच महिलांना आणि ग्रामस्थांना ये जा करताना धोक्याचे होत आहे. बांदा-सटमटवाडी ते डिंगणे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून अर्धवट स्थितीत चालू केलेल्या रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी गटार नसल्यामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे रस्त्यावरून वाहत आहे. हायवे जोडरस्ता हा खड्डेमय झाला असून गणेश चतुर्थीत प्रवास करणे हे धोकादायक ठरणार आहे. या सर्व समस्यांबाबत कार्यवाही करावी; अन्यथा १५ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालयासमोर शाळेतील मुलांसह ग्रामस्थांना उपोषणाला बसू.’ दरम्यान, सरपंच श्रीमती नाईक यांनी तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले. यावेळी उपसरपंच आबा धारगळकर उपस्थित होते. यावेळी सटमटवाडीतील ग्रामस्थ आनंद वसकर, महेंद्र मांजरेकर, प्रदीप कळंगुटकर, संचिता कळंगुटकर, अनिका कळंगुटकर, देवानंद कळंगुटकर, सुविधा कळंगुटकर, साहिल कळंगुटकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com