मेर्वी शाळेत टिळक पुण्यतिथी साजरी
- rat४p१.jpg-
२५N८२०२६
पावस ः मेर्वी जि.प. शाळेत लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना संजया पावसकर, चंद्रशेखर पेटकर, डॉ. आनंद सावंत आणि शिक्षक.
---
मेर्वी शाळेत टिळक पुण्यतिथी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ५ ः रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा मेर्वी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभीस लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार प्रभारी मुख्याध्यापिका संजया पावसकर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. या प्रसंगी उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर, डॉ. आनंद सावंत, शिक्षिका ऐश्वर्या गुरव, अंगणवाडी शिक्षिका सुनीता मेस्त्री, मदतनीस आकांक्षा गुरव आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी भाषणे केली. तसेच लोकमान्य टिळक यांची वेशभूषेतील भूमिका आयूष आनंद म्हादये याने साकारली होती. यावेळी उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केला.