व्यवसाय क्षेत्रामध्ये करिअर घडवा
82040
व्यवसाय क्षेत्रामध्ये करिअर घडवा
गजानन कांदळगावकरः कुडाळात दैवज्ञ समाजातर्फे गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाटचाल करताना स्पर्धा वाढल्याने यश सहज सोपे नाही. आर्टिफिझिकल इंटेलिजन्स (एआय) कितीही नाकारले तरी त्याला सामोरे जावे लागणार आहे. ध्येय निश्चित करा. पुढे जाण्याची क्षमता आपल्या समाजातील मुलांमध्ये आहे. भविष्यात दैवज्ञ समाजातील मुले आनंदी जीवन जगताना व्यावसायिक बनण्याकडे त्यांचा कल असला पाहिजे, असे प्रतिपादन दैवज्ञ समाजाचे युवा उद्योजक गजानन कांदळगावकर यांनी समाजाच्या आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात केले.
दैवज्ञ ब्राह्मण समाज कुडाळ आणि दैवज्ञ महिला मंडळ कुडाळ यांच्यावतीने जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा दैवज्ञ भवन कुडाळ येथे रविवारी (ता. ३) सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. श्रद्धा मालवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक कांदळगावकर, काका कुडाळकर, आनंद मालवणकर, राजू पाटणकर, कनक पाटणकर, माजी मुख्याध्यापक अनंत जामसंडेकर, समीक्षा सोनवडेकर, जयराम डिगसकर तसेच प्रतिभा पाटणकर, स्नेहल कुडाळकर, अनुराधा कांदळगावकर, राहुल पाटणकर, भाऊ पाटणकर, डॉ. विवेक पाटणकर, श्रद्धा पाटणकर, महेश ओटवणेकर, अवधूत ओटवणेकर, मानसी ओटवणेकर, निनाद हिर्लेकर, नितीन हिर्लेकर, विनोद कडोलकर, गीतांजली कांदळगावकर, मनोज मठकर, अमेय पेडणेकर, नागेश कुडाळकर उपस्थित होते.
काका कुडाळकर यांनी, थोर राष्ट्रपुरुष नाना शंकरशेट यांचे कार्य तेवत ठेवण्याचे काम आपण करत आहोत. समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहेत, त्या योजना प्रत्येकाने समजावून त्याचा लाभ कसा घेता येईल, या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत उतरले पाहिजे, असे सांगितले. डॉ. मालवणकर यांनी, स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना कोणत्या क्षेत्रात आपल्याला पाऊल टाकायचे ते आताच ठरवा. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात मिळविलेले यश पाहता पुढील संधीचा वापर करून त्याचे सोन्यात रुपांतर करा. आपल्याबरोबर समाजालाही पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे. स्पर्धा परीक्षेत यश साध्य करण्यासाठी पाच-सहा वर्षे मेहनत करावीच लागणार, असे सांगत समीक्षा सोनवडेकर यांनी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात महिला मंडळ अध्यक्ष कनक पाटणकर यांनी नाना शंकरशेठ यांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. सूत्रसंचालन महेश ओटवणेकर यांनी केले.
चौकट
गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून कौतुक
यावेळी विशेष प्राविण्य वेदिका कारेकर, नील कांदळगावकर, अन्वी कांदळगावकर, लावण्या पेडणेकर, मित वालावलकर, आयुष कारेकर, श्लोक वेदक, सृष्टी कुडाळकर, सुमेध मालवणकर, समीक्षा सोनवडेकर, स्मितेश कटोलकर, रिया पाटणकर, हेमांग कुबल, कार्तिकेयन मडगावकर, अर्पिता ओटवणेकर, शर्वरी कारेकर, इशा खेडेकर, नक्षत्रा मालवणकर, अथर्व नागवेकर या गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.