शिवसेनेला अभिप्रेत काम करा
82041
शिवसेनेला अभिप्रेत काम करा
नीलेश राणेः कुडाळातील बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपले काम पक्ष हितासाठी करा. आपला पक्ष वाढविण्याबरोबरच मित्र पक्षाचे नुकसान होईल, असे वर्तन करू नका, असे आवाहन यावेळी आमदार राणे यांनी केले.
तालुक्यातील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यासाठी कुडाळ एमआयडीसी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सामंत, उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, माजी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, ओरोस प्रमुख दीपक नारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार राणे म्हणाले, ‘‘या नियुक्त्या पक्ष वाढीसाठी दिल्या जात आहेत. आपल्या पक्षाची ध्येयधोरणे आणि लोकहिताचे काम जनतेपर्यंत घेऊन जाण्याची तुमची जबाबदारी आहे. मित्र पक्षांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची सुद्धा जबाबदारीने काळजी घ्यायची आहे.’’
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये उपतालुका प्रमुख हेमंत उर्फ राजन भगत, मिलिंद नाईक, दिनेश वारंग, वेताळ बांबर्डे विभागप्रमुख नागेश आईर, उपविभाग प्रमुख नीलेश बांबर्डेकर, पिंगुळी विभागप्रमुख दिलीप निचम, साळगांव उपविभाग प्रमुख मंगेश चव्हाण, पावशी विभागप्रमुख नागेश परब, उपविभाग प्रमुख सुरेश तानावडे, डिगस उपविभाग प्रमुख गजानन कुलकर्णी, माणगांव उपविभाग प्रमुख अविनाश राणे, माणगाव विभागप्रमुख सचिन धुरी, झाराप उपविभागप्रमुख प्रवीण रेडकर, घावनळे विभागप्रमुख दिनेश शिंदे, घावनळे उपविभागप्रमुख जयराम सुद्रिक, गोठोस उपविभाग प्रमुख सूरज कदम, कुडाळ तालुका संघटन प्रमुख विठ्ठल शिंदे, माणगाव शहर प्रमुख दत्ता कोरगावकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, सत्यवान हरमलकर, अरविंद परब, ओरोस विभाग प्रमुख परशुराम परब, ओरोस उपविभाग प्रमुख प्रकाश देसाई, कसाल विभाग प्रमुख बापू पाताडे, नेरुर विभाग प्रमुख भास्कर नाईक, वालावल उपविभाग प्रमुख मनीष वाडयेकर, नेरुर उपविभाग प्रमुख सचिन नेरुरकर, आंब्रड विभाग प्रमुख विठ्ठल तेली, उपविभाग प्रमुख प्रशांत तावडे, घोटगे उपविभाग प्रमुख सचिन तेली, तेंडोली विभाग प्रमुख सचिन गावडे, उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ, पाट उपविभाग प्रमुख सद्गुरू माधव, चंद्रकांत राणे, पुंडलिक जोशी, बाळा गुरव, गुणवंत सावंत, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, जिल्हा संघटक अंजना सामंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रचना नेरुरकर, जिल्हा सचिव आशा वळप्पी, सहसचिव कविता मोंडकर, कुडाळ तालुका प्रमुख वैशाली पावसकर, उपतालुकाप्रमुख वैष्णवी शिंदे, संगीता खांडेकर, तालुका सचिव नूतन आईर, रेवती राणे, कुडाळ शहर प्रमुख श्रुती वर्दम, तालुका समन्वयक अनघा रांगणेकर, दीक्षा सावंत, कार्यकारिणी सदस्य अनुप्रीती खोचरे, विभाग प्रमुखमध्ये आंब्रड-चैताली ढवळ, ओरोस-सितांजली तळवडेकर, वेताळ बांबर्डे-शुभांगी चव्हाण, तेंडोली-योगेश्वरी कोरगावकर, पावशी-मृणाल परब, घावनळे-साक्षी लाड, माणगाव-दीक्षा आकेरकर. विभागीय सदस्यपदी नाजुका धुरी यांची निवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.