पीकविम्यात दीड हजार शेतकऱी सहभागी
खरीप विम्या’ची मुदत १४ ऑगस्टपर्यंत
शिवकुमार सदाफुले ः दीड हजार शेतकऱ्यांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी शासनाने १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पोर्टलमधील अडचणी, अॅग्रीस्टॅक नंबर नसणे व इतर कारणांमुळे शेतकरी विमा भरु शकलेले नाहीत. त्यामुळे विमा भरण्यास शेतकऱ्यांना संधी मिळावी यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.
हवामानावर आधारित असणाऱ्या खरीप पिकविम्याबाबत जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये अजूनही निरुत्साह आहे. जिल्ह्यात ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकरी खातेदार आहेत. मात्र त्यापैकी प्रत्यक्षात विमा योजनेत केवळ १ हजार ५१३ शेतकरी सहभागी झाले आहेत. खरीप हंगामातील पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील भात, नाचणी या दोन पिकांचा समावेश करण्यात आला होता. १ जुलैपासून पीकविमा भरण्यास सुरुवात झाली होती. त्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. गेली दोन वर्षे एक रुपयात पीकविमा योजना शासनाकडून राबविण्यात येत होती. त्यावेळी पाच ते सहा हजार शेतकरी या योजनेत सहभागी होत होते. जिल्ह्यात कर्जदार २४६ व बिगर कर्जदार १,२६७ मिळून १, ५१३ इतक्याच शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.
नऊ तालुक्यातील सहभागी शेतकरी ः
तालुक* शेतकरी* संरक्षित क्षेत्र (हेक्टर)
मंडणगड* २३४* ४८.२६
दापोली* २६०* ५५.३४
खेड* ३६५* ११२.२
चिपळूण* २५०* ७८.६३
गुहागर* ५९* १३.८४
संगमेश्वर* ११३* २५.८८
रत्नागिरी* ७४* १३.२७
लांजा* ३४* १२.०९
राजापूर* १२४* ३८.२९
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.