दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी साकारल्या सुबक गणेशमुर्ती
rat४p५.jpg-
२५N८२०३१
रत्नागिरी ः श्री गणेश मूर्ती साकारताना १८० विद्यार्थी
----
विद्यार्थ्यांनी साकारल्या गणेशमूर्ती
कांचन डिजिटलचा उपक्रम ; भडेकर यांनी दाखवले प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ः ‘कांचन डिजिटल’तर्फे पाचवी ते सातवी पर्यंतच्या शहरातील विद्यार्थ्यांसाठी श्री गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा केवळ एक कला स्पर्धा नसून, सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सुंदर गणेशमूर्ती साकारल्या.
रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेच्या सभागृहात रविवारी ही स्पर्धा उत्साहात झाली. यावेळी पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी दोन तासांत मन लावून गणेशमूर्ती साकारल्या. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी श्री. बेहरे, रत्नागिरी अर्बन बँकेचे मुख्य कार्याधिकारी श्री. तुपे, उद्योजक प्रसन्न आंबुलकर, गणेश धुरी, नमन ओसवाल, रोहित विरकर, मुकेश गुंदेजा, नीलेश नार्वेकर, सचिन देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख महेश म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, सुदेश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मूर्तिकार दीपक भडेकर (संदेश आर्ट्स) यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मूर्ती बनवताना विशेष मदत मिळाली. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कांचन डिजिटल''चे आयोजक कांचन मालगुंडकर म्हणाले, गेल्या ५ वर्षांपासून घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करत आहे.
---
चौकट
मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेतील विजेते
गणेशमूर्ती बनवण्याच्या स्पर्धेत रुद्र राजेंद्र गुरव, कनक संतोष सातवेकर, स्वराज प्रशांत नाचणकर या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. तसेच विशेष उल्लेखनीय पारितोषिक ओवी किरण वाडेकर, शुभ्रा विरेंद्र विखारे, स्वराज सचिन गोताड, सारा पराग राऊत, ओम शैलेंद्र तोडणकर यांनी तर उत्तेजनार्थ पारितोषिके इशान साईनाथ नागवेकर, केयूर तुळसवडेकर, प्रेम संतोष चंदेरकर, प्रचिती संगम मयेकर, सक्षम संदीप मोसंबकर, ओम विनोद जोशी, स्वरा राजेंद्र जाधव, रुद्र सचिन पवार, पार्थ विशाल कोठेकर, सिद्धी विनोद कांबळे यांना देण्यात आले.
---