पटवर्धन हायस्कूलमध्ये सायबर जागरूकता मोहीम

पटवर्धन हायस्कूलमध्ये सायबर जागरूकता मोहीम

Published on

rat४p१६.jpg-
२५N८२०८८
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित सायबर जागरूकता मोहिमेत सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक

‘पटवर्धन’मध्ये सायबर जागरूकता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर क्लबतर्फे आणि क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने पटवर्धन हायस्कूलमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता करण्यात आली.
पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सायबर वॉरियर क्लबचे सदस्य रिद्धी जाधव, अथर्व सावंत, आर्या रिसबूड, वरद सरदेसाई, पार्वती रावळ, संस्कृती जाधव यांनी सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सावधगिरीच्या उपायांची माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना रोजच्या डिजिटल व्यवहारात कोणती काळजी घ्यावी, हे समजावून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा शपथ घेतली आणि डिजिटल माध्यमात जबाबदारीने वागण्याची प्रतिज्ञा केली. विद्यार्थ्यांना सायबर जागरूकतेचे शिक्षण मिळणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com