महायुतीचे लोककल्याणाला प्राधान्य

महायुतीचे लोककल्याणाला प्राधान्य

Published on

82109

महायुतीचे लोककल्याणाला प्राधान्य
दीपक केसरकर ः सावंतवाडी रुग्णालयात ''डायलेसिसचे'' लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः महायुती सरकारकडून लोककल्याणाच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी येथे केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन नवीन डायलेसिस मशीन बसविण्यात आल्या. त्याचे लोकार्पण आमदार केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सावंतवाडीनंतर दोडामार्ग आणि वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयातही प्रत्येकी दोन डायलेसिस मशीन लवकरच बसवण्यात येणार असल्याची माहिती श्री. केसरकर यांनी दिली. आमदार केसरकर यांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून या मशिनचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्री. केसरकर यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जनतेच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे सांगितले. जनकल्याणाच्या कामांना प्राधान्य देत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले येथे डायलेसिस मशीन बसवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या लोकार्पण सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे, डॉ. गिरीशकुमार चौगुले, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, तालुका प्रमुख नारायण राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शर्वरी धारगळकर, गजानन नाटेकर, सुरेंद्र बांदेकर, देव्या सूर्याजी, आबा केसरकर, परीक्षित मांजरेकर, डॉ. सुबोध इंगळे, डॉ. संदीप सावंत, डॉ. सागर जाधव, डॉ. निखिल अवधूत, भारती मोरे, नारायण राणे, पांडुरंग वजराटकर, महिला जिल्हाप्रमुख अॅड. नीता कविटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com