साटेली तर्फ सातार्ड्यात बेकायदा मायनींग

साटेली तर्फ सातार्ड्यात बेकायदा मायनींग

Published on

82159

साटेली तर्फ सातार्ड्यात बेकायदा मायनींग

ठाकरे शिवसेनेचा आरोप; सत्ताधारी नेत्यांवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः साटेली तर्फ सातार्डा (ता.सावंतवाडी) येथील एका मायनिंग खाणीवर बेकायदा उत्खनन सुरू असून यातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून केला. यामागे सत्ताधाऱ्यांचा हात असून याप्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

श्री. धुरी व श्री. राऊळ यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी साटेली तर्फ सातार्डा येथील एका मायनिंग खाणीवर बेकायदा उत्खननाविरोधात ठाकरे शिवसेनेने आवाज उठवला. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, गुणाजी गावडे, अशोक धुरी, लक्ष्मण आयनोडकर, प्रशांत बुगडे, विजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. धुरी व श्री. राऊळ म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांच्या कृपाशीर्वादामुळे साटेली तर्फ सातार्डा येथे बेकायदा मायनिंग सुरू आहे. ज्या ठिकाणी परवानगी नाही अशा ठिकाणी खोट्या लीजची परवानगी वापरून मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. या प्रकारामागे मोठा घोटाळा असून हा प्रकार खनिकर्म अधिकारी व सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘त्या ठिकाणी सुरू असलेले बेकायदा उत्खनन तात्काळ रोखणे गरजेचे आहे. अन्यथा त्या ठिकाणी खाणीमध्ये पाणी भरून डोंगराखाली असलेल्या घरांना कधीही मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि कळणे गावाची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे तात्काळ याबाबत योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. पंधरा दिवसांत कारवाई करावी; अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून मोठे आंदोलन केले जाईल.’
-----------------
अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक नाही ः धुरी
दोडामार्ग तहसीलदार गेले आठ महिने बेपत्ता आहेत. याविरुद्ध मी आवाज उठविला होता. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी त्यांना आठ दिवसांत हजर करू, असा शब्द दिला होता. मात्र, पालकमंत्र्यांनी सांगून सुद्धा ते हजर झाले नाहीत. त्यामुळे या सरकारचा अधिकाऱ्यांवर वचक नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे, अशीही टीका श्री. धुरी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com