शैक्षणिक साहित्य वाटप
-rat४p१२.jpg-
२५N८२०७५
रत्नागिरी : सुमती अर्हम् मंडळातर्फे महिला प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांसमवेत मंडळाचे पदाधिकाकरी.
-------
‘सुमती अर्हम्’तर्फे
शैक्षणिक साहित्य वाटप
रत्नागिरी, ता. ४ : येथील जैन समाज संचालित सुमती अर्हम् मंडळातर्फे सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय व महिला प्रॅक्टिसिंग स्कूल या दोन्ही शाळेत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. एसटी बसस्थानकासमोरील सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयात येणारे विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असतात. त्यामुळे त्यांच्याकरिता गणवेश देण्याचे काम सुमती अर्हम् मंडळाने केले. तसेच रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १३ म्हणजेच महिला प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकरिता बैठक आणि दप्तराचे वाटप करण्यात आले. या वेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमात उपस्थित होते. यामध्ये याप्रसंगी अशोक भाई मणियार, विक्रम जैन, श्रीपाल जैन, प्रदीप जैन, मानस जैन, भूषण परमार, दीक्षित जैन, अक्षत संघवी, किशोर जैन आणि संयम ओसवाल आदी उपस्थित होते. या मदतीबद्दल जांभेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी व मुख्याध्यापक अनंत देवरूखकर यांनी आभार मानले.