रोटरी क्लब ऑफ सेंट्रल
अध्यक्षपदी अॅड. रावराणे

रोटरी क्लब ऑफ सेंट्रल अध्यक्षपदी अॅड. रावराणे

Published on

रोटरी क्लब ऑफ सेंट्रल
अध्यक्षपदी अॅड. रावराणे
कणकवली ः येथील रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचा रोटरी वर्ष २०२५-२६ साठी पदग्रहण समारंभ नुकताच झाला. रोटरीच्या अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र रावराणे यांनी शपथ घेतली. सचिवपदी सुप्रिया नलावडे, तर कोषाध्यक्षपदी अॅड. गुरुनाथ पावसकर यांची निवड करण्यात आली. प्रमुख पाहुणे रोटेरियन आनंद कुलकर्णी, डॉ. विद्याधर तायशेटे, रोटेरियन सचिन मदने आदी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष अॅड. रावराणे यांनी नवीन सामाजिक प्रकल्प, युवा सहभाग आणि रोटरीची बांधिलकी यावर भर दिला. रोटरीच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू जनतेची सेवा करणार असल्याचे स्पष्ट केले. दादा कुडतरकर यांना मरणोत्तर रोटरी भूषण पुरस्कार प्रदान केला. फोंडाघाट येथील उद्योजक दिनेश नारकर यांना बिझनेस ॲवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. दुर्मिळ रक्तगट बीचे नियमित रक्तदाते आणि पत्रकार राजन चव्हाण यांचा कम्युनिटी सर्व्हिस व्होकेशनल ॲवॉर्ड देऊन सपत्नीक सत्कार केला. पिटिशन रायटर दिवाणी न्यायालय कणकवली येथील माधवराव खांबे यांचाही सपत्नीक सत्कार केला. रोटरी कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी अॅड. दीपक अंधारी यांनी पार पाडली. मेघा गांगण आणि डॉ. सुहास पावसकर यांनी सूत्रसंचालन केले. सुप्रिया नलावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com