-रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष हिराभाई बुटाला यांचे निधन
rat५p४४.jpg-
P२५N८२३६३
हिराचंद बुटाला
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष
हिराभाई बुटाला यांचे निधन
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खेडच्या सहजीवन शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष हिराचंद परशुराम उर्फ हिराभाई बुटाला (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, तीन भाऊ व त्यांचे कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.
नवी मुंबईतील रेवमॅक्स कंपनीचे मालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे स्नेही कौस्तुभ बुटाला यांचे ते वडील होत. श्री. बुटाला यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. खेडमध्ये किराणा मालाचे व्यापारी म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. कालांतराने ते राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले होते. तसेच १९८५ ते १९९० पर्यंत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी पुरस्कार देऊन त्यांचा नवी दिल्ली येथे सन्मान करण्यात आला होता. सहजीवन शिक्षणसंस्थेच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ते १९७३ पासून आतापर्यंत सलग ५२ वर्षे ते अध्यक्षपदावर कार्यरत होते. खेड येथील सहजीवन शिक्षणसंस्थेचे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आयसीएस महाविद्यालय, हिराचंद पर्शुराम बुटाला माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, मदनभाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट खेड, सहजीवन प्रायमरी स्कूल, खेड या आस्थापनांमध्ये श्रद्धांजली वाहून शालेय कामकाज बंद ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर नेरूळ येथे सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.