चिपळूण -प्रथमच दिसला ब्लॅक हेरॉन
८२४१२
८२४१४
८२४१३
चिपळुणात प्रथमच आढळला ब्लॅक हेरॉन
डॉ. अरविंद जोशी ः आफ्रिकेतून स्थलांतराची शक्यता, इंडियन बर्ड जर्नलला दिली माहिती
मयूरेश पाटणकर ः सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ५ : चिपळूण परिसरातील एका पाणथळ जागेत पक्षी निरीक्षक डॉ. श्रीधर जोशी यांना २ काळे बगळे दिसून आले. भारतात हे पक्षी दिसण्याची ही पहिलीच वेळ असल्याने पक्षी अभ्यासकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आफ्रिकेमधून भरकटत हा पक्षी भारतात पोहाेचला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा अधिक अभ्यास व्हावा म्हणून या पक्ष्याचे फोटो आणि माहिती डॉ. जोशी यांनी इंडियन बर्ड जर्नलला पाठवली आहे.
चिपळूणमधील डॉ. श्रीधर जोशी यांना पक्षी निरीक्षणाची आवड आहे. दररोज सकाळी फिरायला जाताना त्यांच्यासोबत कॅमेरा असतो. रविवारी (ता. ३) सकाळी फिरायला गेलेले असताना एका पाणथळ जागी दोन काळे बगळे अनोख्या कॅनोपी फिडिंग किंवा अम्ब्रेला फिडिंग पद्धतीने मासे पकडताना दिसले. डॉ. जोशी यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये छायाचित्रे टिपली. घरी येऊन तातडीने इंटरनेटवरून माहिती घेतली. त्या वेळी जगात या पद्धतीने फक्त ब्लॅक हेरॉन Black Heron – Egretta ardesiaca मासे मारतात, हे डॉ. जोशींच्या लक्षात आले. मग त्यांनी याबाबतची माहिती अन्य पक्षी निरीक्षकांना दिली. सुरुवातीला सर्वांना वाटले की, हा रातबगळा, रातढोकरी (ब्लॅक क्राऊन्ड नाईट हेरॉन) आहे जो भारतात अनेक पाणथळ ठिकाणी दिसतो; परंतु लांब पाय, पूर्ण शरीर काळ्या रंगाचे आणि कॅनोपी फिडिंग या वैशिष्ट्यांवरून हा ब्लॅक हेरॉन असल्याचे सर्वांच्या चर्चेतून नक्की झाले. चिपळूण परिसरात हा दुर्मीळ पक्षी आढळणे ही दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असल्याचे समोर आले.
काळा बगळा म्हणजे ब्लॅक हेरॉन (Black Heron – Egretta ardesiaca) हा मुख्यत्वे सेनेगल, सुदान, तंजानिया, केनिया, मॉझॅम्बिक, दक्षिण आफ्रिका आणि मादागास्कर येथे दिसून येतो. काही अपवादात्मकदृष्ट्या युरोपमधील (ग्रीस, इटली) किंवा आयर्लंडमध्ये (डब्लिन) याची दुर्मीळ नोंदी आढळल्या आहेत. हा पक्षी स्थलांतर करत नाही. अन्न आणि पाण्याचे दुर्भीक्ष्य असेल तरच तो आपला अधिवास सोडून त्याच परिसरातील अन्य ठिकाणी जातो. आजपर्यंत भारतात हा पक्षी आढळल्याची कोणतीही नोंद नाही. त्यामुळेच चिपळूणमध्ये हा पक्षी दिसून आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
काय आहे कॅनोपी फिडिंग
Canopy feeding (किंवा umbrella feeding) ही एक अनोखी मासे पकडण्याची पद्धत आहे, जी काही पाणथळ पक्षी वापरतात. या पद्धतीत पक्षी आपले पंख अर्धवर्तुळाकार करून पाण्यावर सावली निर्माण करतो, ज्यामुळे मासे त्या सावलीत येतात आणि ते सहज पकडता येतात.
कोट
आफ्रिकेतून हे दोन पक्षी भारतात कसे आले, ही अनाकलनीय गोष्ट आहे. गेले आठवडाभर मी हे पक्षी पुन्हा दिसण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी दररोज अनेक पाणथळ जागा मी धुंडाळत आहे.
- डॉ. श्रीधर जोशी, चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.