आयआयटी हैदराबादमध्ये तांबेच निवड

आयआयटी हैदराबादमध्ये तांबेच निवड

Published on

82146

आर्चित तांबेची ‘आयआयटी’साठी निवड
कणकवली ः कणकवली महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र पदवी शाखेचा विद्यार्थी अर्चित गुणाजी तांबे याची आयआयटी हैदराबाद येथील एम. एस्सी. रसायनशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्‍याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्‍याचा सत्कार करण्यात आला.
अर्चित तांबे याने फेब्रुवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील आयआयटी - जॅम (जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर एमएससी) या प्रवेश परीक्षेत अखिल भारतीय पातळीवर ११०५ वा क्रमांक मिळवून प्रवेशासाठी पात्र झाला होता. ग्रामीण भागातील मुले-मुली देखील प्रतिष्ठित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेऊ शकतात, हे अर्चितच्या यशाने सिद्ध झाले आहे,असे गौरवोद्गार शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी सत्काराप्रसंगी काढले. यावेळी प्राचार्य डॉ.युवराज महालिंगे आणि इतर प्राध्यापक उपस्थित होते. रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. शामराव दिसले, प्रा. अविनाश पोरे, प्रा. हेमंत गावित, प्रा. कपिल गडेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, सचिव विजयकुमार वळंजू आदींनी विशेष अभिनंदन केले.
--------
82565

‘जिव्हाळा’ला इन्व्हर्टर, वस्तू प्रदान
सावंतवाडी ः न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्टमार्फत जिव्हाळा सेवाश्रमला इन्व्हर्टर व जीवनावश्यक वस्तूंची भेट आज ‘सामाजिक बांधिलकी’च्या माध्यमातून देण्यात आली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिव्हाळा आश्रमाला रोख रक्कम व जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बिर्जे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ आश्रमातील आश्रयदात्यांना वीज पुरवठा खंडित झाल्यावर काळोखात राहावे लागते, याकडे लक्ष वेधत इन्व्हर्टरची मागणी केली होती. संस्थेच्या रुपा मुद्राळे यांनी यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द दिला होता. त्यासाठी संस्थेच्या रुपा गौंडर (मुद्राळे) यांनी प्रयत्न करून न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट यांना माहिती दिली. त्यांनी त्यासाठी लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आज जिव्हाळा सेवाश्रमाला या ट्रस्टमार्फत इन्व्हर्टर ड्रायफर व जीवनावश्यक साहित्य अशा सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या वस्तू देण्यात आल्या. ट्रस्टचे अध्यक्ष बिरजे यांनी न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट ख्रिश्चनवाडी, माजगाव-गरड, सावंतवाडी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आभार मानले. यावेळी अधिकारी ऑगस्टीन फर्नांडिस, इशेद परेरा, मायकल फर्नांडिस, ऋषिकेश नाईक तसेच सामाजिक बांधिलकीच्या रुपा मुद्राळे, शरदिनी बागवे व रवी जाधव आदी उपस्थित होते.
------
82582

जिल्ह्यातील पाच जणांना ‘कोकणरत्न’
कणकवली ः डोंबिवलीतील अखिल कोकण विकास महासंघाने यंदाच्या १८ व्या वर्षांचे १४ मान्यवरांना कोकणरत्न पुरस्कार जाहीर केले आहेत. सिंधुदुर्गातील ज्येष्ठ पत्रकार, गिरणी कामगार नेते गणपत तथा भाई चव्हाण यांच्यासह चित्रपट, मालिका क्षेत्रांतील हास्य कलावंत भाऊ कदम, हास्य अभिनेत्री शिवानी परब, दशावतारी कलावंत ओमप्रकाश चव्हाण, सामाजिक क्षेत्रातील डॉ. अमित दुखंडे या ५ मान्यवरांना यंदाचे कोकणरत्न पुरस्कार जाहीर केले आहेत. या व्यतिरिक्त कोकणातील आणखी ९ मान्यवरांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्कारांचे वितरण ८ ऑगस्टला सायंकाळी ७.३० वाजता डोंबिवली पच्शिम येथील समाज मंदिर, घनश्याम गुप्ते मार्ग येथे होणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांमध्ये कोकणातील सामाजिक कार्यकर्ते संजय यादवराव, हास्य अभिनेते प्रभाकर मोरे, अभिनेत्री संजीवनी पाटील, मुंबई क्रिकेट संघाचे प्रशिक्षक दिनेश लाड, मराठी चित्रपट लेखक राजेश देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार आत्माराम नाटेकर, पखवाज सम्राट डॉ. दादा परब, भजन सम्राट प्रकाश चिले, अभिनेते मुकेश जाधव, पॉवर लिफ्टिंग सुशांत आगरे या ९ मान्यवरांचा समावेश आहे.
---
(ही दुसऱ्या पट्ट्यासाठी टॉपला घ्या)
82336

किसान निधी वितरण कार्यक्रमात
सिंधुदुर्गनगरीत शेतकऱ्यांना धडे
ओरोस ः किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यावतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सिंधुदुर्गनगरी येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय येथे करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृषी प्रतिष्ठान किर्लोसचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांना दिली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा भाग्यश्री नाईकनवरे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत, विकास धामापूरकर, सुयश राणे, अधिकारी मंगेश पालव, नरेंद्र सावंत, प्राचार्य डॉ. सिद्धेश भेंडे, प्रा. प्रसाद ओगले, महेश परुळेकर, तालुका कृषी अधिकारी माधुरी राऊत, मंडळ कृषी अधिकारी डी. एस. सगरे, विजय घोंगे, उपकृषी अधिकारी गीता परब, साक्षी परब, मनीषा पाटील, कृषी सेवक श्रीमती एस. पी. सामंत उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होत नाही अशा शेतकऱ्यांच्या नोंदी घेऊन मदत करण्यात आली. २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. कृषी विभागाचे उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांनी प्रास्ताविक केले.
-------
फोंडाघाट येथे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण
फोंडाघाट ः पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुद्धिमत्ता शिबिर प्राथमिक शिक्षकांसाठी फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी १३० शिक्षक सहभागी झाले. या शिबिराचे मार्गदर्शन रचना कम्प्युटर टेक्नॉलॉजीचे गणेश इस्वलकर आणि इन साईट कॉम्प्युटरचे प्रशांत वांजुळे यांनी केले. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? त्याचा इतिहास, कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रकार, रोजच्या जीवनात होणारा वापर व फायदा याविषयी माहिती दिली. तसेच शिक्षकांना उपयोगी कृत्रिम बुद्धिमत्ता टूलचा वापर कसा करावयाचा? याविषयी माहिती दिली. फोंडाघाट महाविद्यालयात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फोंडाघाट, डामरे - तिवरे, घोणसरी, हरकुळ खुर्द, पियाळी या प्रभागाच्या वतीने केंद्रप्रमुख सुभाष महाले यांनी या उपक्रमामुळे शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक जीवनात भरपूर फायदा होईल असे मनोगत व्यक्त केल. मुख्याध्यापक प्रसाद पारकर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. गायत्री इस्वलकर, धनश्री बागवे, ओंकार मेस्त्री, नेहा आरेकर यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com