कासार्डेत १६ ऑगस्ट रोजी भव्य दहीहंडी

कासार्डेत १६ ऑगस्ट रोजी भव्य दहीहंडी

Published on

बातमीत ः दहीहंडीचे क्लिपआर्ट वापरणे आवश्‍यक
----------

कासार्डेत १६ ऑगस्ट रोजी भव्य दहीहंडी

प्रमोद जठार मित्रमंडळातर्फे आयोजन, एक लाखाचे बक्षीस

सकाळ वृत्तसेवा
कासार्डे,ता.६ ः जिल्ह्यातील मानाची दहीहंडी समजल्या जाणाऱ्या कासार्डे येथील (ता.कणकवली) भाजप प्रदेश चिटणीस तथा माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळातर्फे शनिवारी (ता.१६) दुपारी २ ते रात्री १० दरम्यान गोपाळकाल्यानिमित्त भव्य दहीहंडीचे आयोजन केले आहे. यातील विजेत्या मंडळास रोख १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमसाठी खासदार नारायण राणे, भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आदी उपस्थितीत राहणार आहेत.
जठार मित्रमंडळातर्फे दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात मानाची दहीहंडी म्हणून साजरी होते. यंदाही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा दोन जिल्ह्यांतील सहभागी गोविंदा पथकांसाठी दहीहंडीचे आयोजन केले आहे. यावेळी आठ थरांचे मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला रोख १ लाख ११ हजार १११ रुपये आणि आकर्षक कोकण दूध चषक देण्यात येणार आहे.
चार थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख ३ हजार ३३३ रुपये, पाच थरांची सलामी देणाऱ्यासाठी ४ हजार ४४४ रुपये, सहा थरांची सलामी देणाऱ्यासाठी ५ हजार ५५५ रुपये, सात थरांची सलामी देणाऱ्यासाठी ६ हजार ६६६ रुपये आणि प्रत्येकी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. तसेच सायंकाळी ४ वाजल्यानंतर खास रसिक प्रेक्षकांसाठी सध्या महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर गाजत असलेला कोल्हापूर येथील उमर मुल्ला प्रस्तुत ऑर्क्रेस्ट्रा ‘तुफान मेलडीज’ हा कार्यक्रम होणार आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ कुपन, आकर्षक भेटवस्तूचे आयोजन केले आहे. या उत्सवामध्ये सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील गोविंदा पथकांनी सहभागी व्हावे. इच्छुकांनी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव, रोहित महाडीक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com