हातात झांज, मुखात राम घेऊन अखंड कीर्तन सेवेची इच्छा
-rat६p२४.jpg -
P२५N८२५९४
सायली मुळ्ये यांची मुलाखत घेताना अविनाश काळे.
----
हातात झांज, मुखात राम घेऊन अखंड कीर्तनसेवेची इच्छा
सायली मुळ्ये-दामले ः आई-बाबांच्या आवडीमुळे संगीत क्षेत्रात
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ६ ः आई-बाबांना संगीताची खूप आवड होती तसेच बालवाडीपासून शाळेतील बाईंना पेटी वाजवताना पाहिले आणि आईला हे वाद्य आवडल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडे पेटीच्या शिकवणीला घातले. मी पेटी घेतली आणि पेटी वाजवण्यास शिकले. प्रसिद्ध गायिका संध्या सुर्वे यांच्याकडे गायन शिकले. त्यांनी तळमळीने शिकवले. त्यामुळे मला स्वतःचे वेगळेपण सिद्ध करता आले. भविष्यात हातातील झांज आणि मुखात राम घेऊन अखंड कीर्तनसेवा घडावी अशी इच्छा आहे, असे कोळंबे येथील कीर्तन अलंकार सायली मुळ्ये-दामले यांनी सांगितले.
येथील गोळपकट्ट्यावर त्यांची मुलाखत झाली. त्या म्हणाल्या, मूळ गावी शिक्षणाची किंवा बाकी अन्य गोष्टी शिकण्याची संधी नाही, हे लक्षात आल्यावर मला आणि माझ्या मोठ्या भावाला घेऊन आई रत्नागिरी येथे राहायला आली. आधी बाबा येऊन-जाऊन असायचे; पण कालांतराने ते सुद्धा रत्नागिरीत आले. सुरुवातीचे शिक्षण परशुरामपंत अभ्यंकर विद्यालय आणि नंतर फाटक हायस्कूल येथे झाले. आई-बाबांना संगीताची खूप आवड त्यामुळे माझ्या रक्तातही ते उतरलं असावं. बालवाडीमध्ये असताना शाळेतील काळेबाईंना पेटी वाजवताना पाहून आईला हे वाद्य मला आवडलं, असे सांगितले. त्यामुळे आईने त्यांच्याकडे पेटीच्या क्लासला घातलं. मी शिकेन म्हणून माझ्यासाठी घरी पेटी घेतली. सुरुवातीला भात्याला हात पोचत नव्हता. सूरसुद्धा पेटीवर आईने स्केचपेनने लिहून ठेवले होते. ते पाहून वाजवायचे. रत्नागिरीमध्ये मोठ्या गायकाचा कार्यक्रम आईच्या मांडीवर बसून पाहिला. त्या वेळी तुला कोणाकडे गायन शिकायला आवडेल. त्या वेळी व्यासपिठावर असलेल्या संध्या सुर्वे यांच्याकडे आवडेल, असे सांगितले. संध्याताई यांना मी दुसरी आई म्हणते. संध्याताई शिस्तीच्याबाबत कठोर आहेत. आधीच्या वेळचं शिकवलेलं त्यांना पुढच्या आठवड्यात सगळं म्हणून दाखवावं लागायचं. त्यामुळे त्या भीतीने मला रियाज करून माझा अभ्यास चोख करायची सवय लागली. आता मी गायन विशारद झाले आहे. लहानपणी संस्कृत आणि गीतेचा अभ्यास चांगला पक्का झाला होता. त्या वेळेला संस्कृतचे गाढे अभ्यासक फडकेशास्त्री मुलांना संस्कृत शिकवायचे. मी सुद्धा जायचे शिवाय आमच्या संस्कृतच्या शिक्षिका, अभ्यंकर मावशी आणि मावशींचे यजमान यांच्यामुळे माझं संस्कृत पक्क झालं.
कीर्तनाची आवड असं काही नव्हतं. मला स्व. किरण जोशी अनेकदा त्यांच्या कीर्तनाला पेटीच्या साथीला न्यायचे. एकदा नंदकुमार कर्वे बुवा यांनी अध्यात्म मंदिरात कीर्तन प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं. मी पेटीच्या साथीला होते. त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. त्यांनी मला तुला गायन येते, वाचन आहे, संस्कृत येतं मग तू कीर्तन का करत नाहीस? असं विचारलं. मग मलाही कीर्तन करावं, असं वाटायला लागलं. तिथून कीर्तन विषय सुरू झाला नंतर चिपळूणचे महेश काणे बुवा यांनी रत्नागिरीमध्ये कीर्तन प्रशिक्षण सुरू केले होतं.
चौकट
संगीत नाटकातही भूमिका
आतापर्यंत ३५० पेक्षा जास्त कीर्तने महाराष्ट्र, गुजरात, हैद्राबाद, गोवा येथे झाली. काळाराम मंदिर नाशिक, समर्थ सदन सातारा इ. अनेक नामवंत कीर्तन महोत्सवात कीर्तनसेवा करता आली. आता कीर्तन अलंकार ही पदवी मिळवली असल्याचे मुळ्ये-दामले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.