संक्षिप्त

संक्षिप्त

Published on

-rat६p४.jpg-
P२५N८२४७४
रत्नागिरी : डीजीके कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शक हेरंब पोंक्षे यांचे स्वागत करताना प्राचार्य मधुरा पाटील.
----------
बँकिंग क्षेत्र करिअरवर
‘डीजीके’त मार्गदर्शन
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय (डीजीके) बँकिंग क्षेत्रातील करिअर- मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. यात हेरंब पोंक्षे यांनी मार्गदर्शन केले. बँकिंग क्षेत्रातील परीक्षा, विषयांचा अभ्यास, परीक्षापद्धती, परीक्षेत येणारे प्रश्न, रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी या सत्रामध्ये सहभागी झाले. या वेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. राखी साळगावकर, कॉमर्स अँड सोशल फोरमचे प्रमुख प्रा. वैभव कीर उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरवी ओळकर हिने केले. तन्वी पटवर्धन हिने आभार मानले.

शहर भाजपतर्फे
गणेशोत्सव सजावट स्पर्धा
रत्नागिरी : रत्नागिरी शहर भाजपतर्फे शहर मर्यादित घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष परशुराम तथा दादा ढेकणे यांनी केले आहे. ही स्पर्धा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणेशभक्तांनी स्वतः समवेत आपल्या घरातील सजावटीचे छायाचित्र वेगवेगळ्या अँगलने काढून व एक मिनिटाचा व्हिडिओ (रिल) करायचा आहे व हा व्हिडिओ पाठवायचा आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.


-rat६p२९.jpg-
P२५N८२६०९
कुडुक खुर्द : पत्रावळी उद्योगाचा प्रारंभ करताना कुडुकखुर्द येथील महिला व उमेदचे अधिकारी.

महिलांनी सुरू केला
पत्रावळी उद्योग
मंडणगड ः मंडणगड उमेद अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील महिला रोजगार स्वयंरोजगार व व्यवसाय क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. तालुक्यातील कुडुक खुर्द गावातील जननी रुक्मिणी स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उमेद अभियानाच्या माध्यमातून परस्पर सहकार्याने सुरू केलेल्या पत्रावळी कारखान्याचे उद्‍घाटन तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशक अमित सरमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रभाग संघ व्यवस्थापक शुभ्रा कदम व महिला उपस्थित होत्या.

-rat६p११.jpg ः
२५N८२४८६
शेनाळे ः प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षक राख्या बनवताना.

टाकाऊ वस्तूंपासून
राख्यांची निर्मिती
मंडणगड ः शेनाळे शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून राख्यांची निर्मिती करत स्वनिर्मितीचा आनंद घेतला. शाळेत मुख्याध्यापक सुनील आईनकर यांच्या कल्पक नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. शेनाळे ही तालुक्यातील एक उपक्रमशील शाळा आहे. एकच ध्यास गुणवत्ता विकास हे ब्रीदवाक्य घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवत जातात. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये राखी बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या राख्या शाळेतील शिक्षिका शेले यांच्या मार्गदर्शनाखाली टाकाऊ वस्तूंपासून मुलांनी राख्या बनवल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सतीश खैरे, गणेश गुळेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com