प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार

प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार

Published on

- rat७p४.jpg-
P२५N८२७३६
रत्नागिरी ः तालुक्यातील सैतवडे येथील दी मॉडेल इंग्लिश स्कूल येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात बोलताना न्यायाधीश आर. आर. पाटील सोबत अन्य मान्यवर.

प्रत्येकाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार
न्यायाधीश आर. आर. पाटील ः कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ः भारतीय घटनेनुसार प्रत्येक मुलाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्याला आत्मनिर्भर करण्यासाठी व मदतीचा हात देण्यासाठीच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने रत्नागिरीत कायदेविषयक जनजागृती केली जात आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील सैतवडे येथील दी मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी बालअनुकूल कायदेशीर सेवा योजना २०२४, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पोक्सो कायदा, समाजातील महिलांची सुरक्षा आणि गोपनीयता व जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, समाजात कायदेविषयक जागृती निर्माण करण्याचा मुख्य उद्देश आहे शिवाय समाजातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. विशेषतः बालक, स्त्रिया व वृद्ध हे अन्यायाला अधिक बळी पडत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी सरकाराने कडक कायदे केले असल्याचे सूचित केले.
या प्रसंगी ॲड. अमित शिरगावकर यांनीही पोक्सोसंदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास कोळेकर यांनी पाटील व शिरगावकर यांचा सत्कार केला. तसेच मुख्याध्यापक कोळेकर यांना नुकताच राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कोकण मराठी साहित्य परिषदेचे युवाशक्ती प्रमुख व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीचे कायदा साथी अरुण मोर्ये यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. माधव अंकलगे यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री बळकटे व विनोद पेढे यांनी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com