राखी खरेदीसाठी सावर्डे बाजारपेठेत गर्दी

राखी खरेदीसाठी सावर्डे बाजारपेठेत गर्दी

Published on

- rat७p५.jpg-
२५N८२७३७
सावर्डे : बाजारपेठेत लावण्यात आलेले विविध प्रकारच्या राख्यांचे स्टॉल.

राखी खरेदीसाठी सावर्डे बाजारपेठेत गर्दी
महिलांचा उत्साह वाढला; २ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत राख्या
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ७ : बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे महिलांनी बाजारपेठेत खरेदीसाठी धाव घेतली आहे. सावर्डे बाजारपेठेत दुकानातून विविध प्रकारच्या राख्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामध्ये अगदी दोन रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध आहेत.
यंदा बाजारपेठेत नावीन्यपूर्ण राख्यांचे प्रकार पाहावयास मिळत आहेत. त्यात डिस्कोलाइट कीड्स, झूम, शुभम, खुशबू, चंदनाचा गंध असणारी राखी अशा विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. काही प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्येसुद्धा राखी बनवण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. त्याच राख्या शाळेमधून वापरण्यात येत आहेत. त्याचा किंचित परिणाम बाजारपेठेत विक्रीस असणाऱ्या राख्यांवर होणार आहे. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर भाऊ व बहीण यांनी एकमेकांना देण्यासाठी भेटवस्तू, कपडे, सौंदर्य प्रसाधने, मिठाई यासाठी दुकाने गजबजली आहेत. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी पाहावयास मिळत आहे. महिलांनी भावासाठी आकर्षक राख्या तर भावांनी बहिणींना देण्यासाठी साड्या, कुर्ते, ड्रेस मटेरिअल, पारंपरिक अलंकार, बांगड्या आदी वस्तूंची खरेदी सुरू केली आहे. मिठाई विक्रेत्यांकडेही लाडू, बर्फी, काजू कतली, बासुंदीसारख्या पारंपरिक मिठाईसाठी मागणी वाढली आहे. स्थानिक दुकानदार व फेरीवालेदेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती, नवीन आकर्षक वस्तू व विशेष सजावट करत आहेत. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला राखी व भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात मोठी गर्दी होईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

चौकट
पोस्टाने पाठवण्याचा खर्च जास्त
परगावी असलेल्या भावाला पोस्टाने राखी पाठवण्यासाठी यंदा पोस्टखात्याने विशिष्ट प्रकारचे पाकीट उपलब्ध केले आहे. त्याची किंमत १३ रुपये आहे. त्याला पुन्हा ५ रुपयांचे तिकीट लावावे लागत आहे. त्या पाकिटाचा खर्च १७ रुपये होतो. त्यामुळे काही अंशी नागरिकांमध्ये नाराजी आहे. पोस्टात अन्य प्रकारची ५ रुपयामध्ये उपलब्ध होणारी पाकिटे नसल्यामुळे नाईलाजाने तीच पाकिटे विकत घेऊन पोस्टाने राखी पाठवावी लागत आहे. नागरिकांनी पोस्टाने पाठवलेल्या राख्या त्या वेळेत पोहोचण्यासाठी व त्या कुठेही खराब होऊ नयेत म्हणून ही पाकिटे उपलब्ध केली आहेत, असे पोस्टखात्याचे म्हणणे आहे.

कोट
राखी उत्पादकांची संख्या वाढल्याने स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे राखीच्या विक्रीदरात फारशी वाढ झालेली नाही. राखी खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे.
- सचिन नरोटे, विक्रेते
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com