आपत्ती व्यवस्थापन प्रत्येकाचे कर्तव्य
82763
आपत्ती व्यवस्थापन प्रत्येकाचे कर्तव्य
डॉ. व्ही. व्ही. दळवीः मुळदे महाविद्यालयात प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ः आपत्ती व्यवस्थापन हा केवळ प्रशासनाचा नाही तर प्रत्येक सुजाण नागरिकाचा सामाजिक आणि नैतिक दायित्वाचा विषय आहे, असे प्रतिपादन मुळदे उद्यानविद्या महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. दळवी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची रणशाळा कार्यक्रमात केले.
उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली) येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन शालेय प्रशिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे झाला. कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणात एनडीआरएफ, सिंधुदुर्ग येथील १५ सदस्यीय दक्ष आणि प्रशिक्षित पथकाने मार्गदर्शन केले. यामध्ये निरीक्षक व पथक प्रमुख आर. जे. यादव यांच्यासह पथकातील इतर तज्ज्ञ प्रतिनिधींनी उपस्थित राहून सैद्धांतिक व प्रात्यक्षिक सत्रांद्वारे विविध आपत्ती स्थितींचे मार्गदर्शन केले. एनडीआरएफची कार्यपद्धती, शिस्तबद्ध रचना व आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सीपीआर (कार्डियो पल्मोनरी रिससिटेशन) चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक व जीवनरक्षण कौशल्य, आग लागल्यास होणाऱ्या जळजळीत जखमा व त्यावरील प्राथमिक उपचार, हाडे मोडणे, रक्तस्त्राव यासारख्या आपत्तीजन्य अवस्थांवर तातडीची मदत पूरस्थितीत सुरक्षितता-फ्लोटिंग डिव्हाइसेस वापरण्याचे प्रात्यक्षिक,आग, पूर व इतर नैसर्गिक आपत्तींमध्ये वर्तन व आपली सुरक्षा कशी करावी0 याचे मार्गदर्शन विविध आधुनिक आपत्ती व्यवस्थापन उपकरणांचे प्रत्यक्ष प्रदर्शन व वापराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व कामगार वर्ग सहभागी झाला. विशेषतः महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील ३४ कॅडेट्स तसेच एनएसएस स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे डॉ. व्ही. व्ही. दळवी यांनी केले.
आपत्ती व्यवस्थापन हा केवळ प्रशासनाचा नाही तर प्रत्येक सुजाण नागरिकाचा सामाजिक आणि नैतिक दायित्वाचा विषय आहे, असे सांगत विद्यार्थ्यांना आपत्तीच्या काळात पहिल्या प्रतिसादकर्त्याच्या भूमिकेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक प्राध्यापक व राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रभारी प्रा. हर्षवर्धन वाघ यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश उईके, यांनी समन्वय व नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.