आरोग्य केंद्र, रुग्णालयात हिरकणी कक्ष

आरोग्य केंद्र, रुग्णालयात हिरकणी कक्ष

Published on

- rat७p१०.jpg-
२५N८२७७२
रत्नागिरी ः जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. अनिरुद्ध आठल्ये.
----
आरोग्यकेंद्र, रुग्णालयात हिरकणी कक्ष
डॉ. अनिरुद्ध आठल्ये ः मातांना सुविधा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः शासनाने जाहीर केलेल्या स्तनपान सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयात ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात आले आहेत. येथे मातांना निःसंकोचपणे स्तनपान करता येईल तसेच आशा व आरोग्यसेविकांकडून आवश्यक मार्गदर्शन मिळेल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.
जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताहानिमित्त जिल्हा रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, डॉ. वसीम सय्यद, डॉ. शायन पावसकर, डॉ. आदित्य वडगावकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी नामदेव बेंडकुळे, जयश्री शिरधनकर, पीएचएन माया सावंत तसेच सर्व आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी चित्रफितीद्वारे उपस्थितांना स्तनपानाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. बाळाचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच महिलांना कुठेही आणि कधीही स्तनपान देण्याच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी १ ते ७ ऑगस्टदरम्यान जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. यावर्षी स्तनपानाला प्राधान्य द्या : शाश्वत साहाय्यक व्यवस्था तयार करा, अशी थीम आहे.
स्तनपान करण्यासाठी अनेक शासकीय व खासगी कार्यालये, दवाखाने, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मॉल आदी ठिकाणीही स्तनदा मातांसाठी सुरक्षित हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सर्व स्तनदा मातांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
---
कोट
आईचे दूध हे बाळासाठी अमृतासमान आहे. प्रसूतीनंतर एका तासाच्या आत दिलेले चीकदूध म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण असून, त्यातून बाळाला रोगप्रतिकारशक्ती मिळते. पहिल्या सहा महिन्यानंतरही स्तनपान सुरू ठेवून पूरक आहार दिल्यास बाळाची शारीरिक व मानसिक वाढ योग्य प्रकारे होते.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com