तेली समाज मंडळातर्फे सावंतवाडीत गुणगौरव

तेली समाज मंडळातर्फे सावंतवाडीत गुणगौरव

Published on

swt710.jpg
82794
सावंतवाडी ः येथे बांधवांना मार्गदर्शन करताना माजी अध्यक्ष व संस्थापक जयराम आजगावकर.

तेली समाज मंडळातर्फे
सावंतवाडीत गुणगौरव
सावंतवाडी, ता. ७ः तालुक्यातील तेली समाज उत्कर्ष मंडळातर्फे विद्यार्थी पालक गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. येथील परमपूज्य संताजी नगर न्यू खासकीलवाडा या ठिकाणी परमपूज्य संताजी गगनाडे महाराज व आदिमाया आदिशक्ती शारदा देवी यांना नतमस्तक होऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक रामदास निवलेकर, प्रमुख वक्ते म्हणून प्रेमानंद कासकर, विद्यमान अध्यक्ष श्याम निवलेकर, विद्यमान कार्याध्यक्ष श्रीकृष्ण तेली, उपाध्यक्ष दिनकर तेली, सचिव महादेव आजगावकर, खजिनदार दिपा तेली आदी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांनी शालेय जीवनामध्ये वावरत असताना विज्ञान युगात संघर्षातून मार्ग काढण्याचे सुचविले. या कार्यक्रमाला तब्बल ३२ विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.
--------------
swt79.jpg
82795
वाफोलीः कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन करताना सरपंच उमेश शिरोडकर. बाजूला चेअरमन धनश्री गवस व अन्य.

मुळदे ‘उद्यानविद्या’मार्फत
वाफोलीत कृषी माहिती केंद्र
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ७ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेच्या ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून वाफोली येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन सहयोगी अधिष्ठाता डॉ. वि. वि. दळवी यांच्या उपस्थितीत झाले. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांचे समाधान शोधण्यासाठी तसेच त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी वाफोली गावात कृषी माहिती केंद्र स्थापन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी वाफोलीचे सरपंच उमेश शिरोडकर हे होते. यावेळी उपसरपंच विनेश गवस, सहयोगी प्राध्यापक डॉ. देव्हारे, सहाय्यक विस्तार विशेषज्ञ डॉ. उईके, कृषी सहाय्यक रसिका वसकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष विलास गवस, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश सावंत, धनश्री गवस, मंथन गवस आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. देव्हारे, डॉ. उईके यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रज्ज्वल उगवेकर यांनी केले. आर्य मोरजकर यांनी प्रास्ताविक केले. वैष्णव जगदाळे यांनी आभार मानले. यावेळी संतोष घेरडे, यश वाघ, अथर्व देवळेकर, राज नाईक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com