फोटोसंक्षिप्त-गवस यांच्या मुलास बँकेतर्फे विमा सुपूर्त
82823
गवस यांच्या मुलास
बँकेतर्फे विमा सुपूर्द
कुडाळ, ता. ७ ः मोर्ले (ता. दोडामार्ग) येथील शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस यांचा हत्तीच्या हल्ल्यात काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस मुलगा विनोद लक्ष्मण गवस याला बँक ऑफ इंडिया शाखा दोडामार्ग यांच्या प्रयत्नांमुळे २ लाख रुपयांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शाखा व्यवस्थापक शरद पेडामकर, करनम नंदकिशोर, अग्रणी जिल्हा प्रबंधक ऋषिकेश गावडे, बँक ऑफ इंडिया एसकेवीके प्रमुख राजाराम परब, नगरसेवक राजेश प्रसादी, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष सागर शिरसाट, शुभम गावडे, मतीरामा मूर्ती, अनिल टेकडे, समीर राऊत, वेंकडोथ नाईक, अक्षय कुमार, नम्रता देसाई, वनश्री गवस आदी उपस्थित होते.
82824
चराठे क्र. १ शाळेच्या
शिक्षकांचे अभिनंदन
सावंतवाडी, ता. ८ ः चराठे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, चराठा क्रमांक १ ला पीएमसी अंतर्गत ''बेस्ट स्कूल'' म्हणून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळेच हे यश मिळाल्याचे परब यांनी यावेळी सांगितले. त्यांनी शाळेच्या समस्या जाणून घेतल्या. यात शाळेची बाहेरील संरक्षक धोकादायक भिंत निधी उपलब्ध झाल्यास त्या माध्यमातून बांधण्याचा प्रयत्न केला जाईल, अन्यथा स्वखर्चाने ती बांधून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तसेच लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश परब, सरपंच प्रचिती कुबल, मुख्याध्यापिका पेडणेकर, शिक्षक कुंभार, बाळू वाळके, राजू कुबल आणि क्लेटस फर्नांडिस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.