‘नशाबंदी’च्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना बांधली व्यसनमुक्तीची राखी

‘नशाबंदी’च्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना बांधली व्यसनमुक्तीची राखी

Published on

kan72.jpg
82825
मुंबईः येथील मंत्रालयात नशाबंदी मंडळाच्या संघटक अर्पिता मुंबरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना व्यसनमुक्‍ती उपक्रमांतर्गत राखी बांधली


‘नशाबंदी’च्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना बांधली व्यसनमुक्तीची राखी
संघटक अर्पिता मुंबरकरः सिंधुदुर्गसह राज्य व्यसनमुक्त करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.७ : महाराष्‍ट्र राज्‍य नशाबंदी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आज राज्‍यातील विविध मंत्र्यांना व्यसनमुक्‍ती उपक्रमांतगत राखी बांधली. या उपक्रमातून सिंधुदुर्गसह संपूर्ण महाराष्ट्र व्यसनमुक्त करा असे आवाहन मंत्रीमहोदयांना करण्यात आल्याची माहिती नशाबंदी मंडळाच्या संघटक अर्पिता मुंबरकर यांनी दिली.
नशाबंदी मंडळाच्या कोकण विभागातील संघटकांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री नितेश राणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि भा.प्र.से. सचिव हर्षदीप कांबळे यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून समाजातील वाढत्या व्यसनांना आळा घालण्याची विनंती केली. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि उपनगरातील संघटक अर्पिता मुंबरकर, रविंद्र गुरचळ, मिलिंद पाटील, चेतना सावंत आणि दिशा कळंबे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
व्यसनमुक्तीची राखी बांधून ‘व्यसनमुक्तीशी बंधन-व्यसनांपासून रक्षण’ या अभिनव अभियानाची आजपासून सुरवात केली आहे. जनतेचे व्यसनांपासून रक्षण करून सिंधुदुर्गसह राज्‍य नशामुक्त करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती कोकण विभागातील संघटकांनी मंत्रीमहोदयांकडे केली असल्‍याची माहिती नशाबंदी मंडळाच्या जिल्‍हा संघटक मुंबरकर यांनी दिली.
रक्षाबंधन हा उत्सव रक्षण करणाऱ्यांना अभिवादन आणि आभार व्यक्त करण्याचा आहे. नशाबंदी मंडळाने या उत्सवाच्या निमित्ताने व्यसनमुक्तीची बांधिलकी जोपासण्याचा उपक्रम राबवला आहे. तर सर्व मंत्र्यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत समाजाचे व्यसनांपासून संरक्षण करण्याचे आश्वासन दिले असल्याचे मुंबरकर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com