मालवण येथे कबड्डी स्पर्धा

मालवण येथे कबड्डी स्पर्धा

Published on

मालवण येथे
कबड्डी स्पर्धा
मालवण : नारळी पौर्णिमेनिमित्त येथील लायन्स, लायनेस क्लबच्या वतीने उद्या (ता.८) दुपारी ३ वाजता बंदर जेटी लगतच्या किनाऱ्यावर जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील पुरुष व महिलांचे संघ सहभागी होणार असून क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. स्पर्धेविषयी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ललित चव्हाण व विवेक नेवाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
-------------
कचरा दुर्गंधीबाबत
तोडगा काढा अन्यथा...
सावंतवाडीः शहरातील आंबोली रस्त्यावर चंडू फळी जवळपास असलेल्या कचरा डम्पिंग ग्राउंडवरून येणाऱ्या दुर्गंधीबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, असे सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी म्हटले आहे. या ठिकाणी कचरा रस्त्यापर्यंत आल्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास १६ ऑगस्टला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, पुणे येथे सावंतवाडी पालिकेविरुद्ध दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा श्री. कल्याणकर यांनी पत्रकात दिला आहे.
------------
वजराट येथे उद्या
रक्तदान शिबीर
वेंगुर्लेः वजराट ग्रामपंचायत आणि श्री सातेरी वाचनालय व गुरुमाऊली माई मांजरेकर ग्रंथ संग्रहालय, वजराट यांच्यावतीने शनिवारी (ता. ९) सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत वजराट ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांनी आनंद पुराणिक यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी. जास्तीत जास्त रक्तदात्यांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--------------
वरवडेत १३ ला
संचालक निवड
कणकवलीः वरवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधी या प्रवर्गातील एका संचालकाच्या निवडीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १३ ला दुपारी ३ वाजता संस्थेच्या वरवडे येथील कार्यालयात संचालक मंडळाची सभा आयोजित केली आहे. यात दुपारी ३ वाजता नामनिर्देशन पत्रवाटप व ''स्वीकृती, ३.१५ नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे, ३.३० ते ३.४५ नामनिर्देशन पत्रांची माघार, ३.४५ अंतिम उमेदवार यादी जाहीर करणे व ३.५० मतदान प्रक्रिया होणार आहे. सर्व संचालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
-------------
दोडामार्ग ‘औद्योगिक’मध्ये
नवा अभ्यासक्रम सुरु
दोडामार्गः येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा ‘न्यू एज’ कोर्स योजनेखाली मॅकॅनिक इलेक्ट्रीक व्हिएकल हा २ वर्षाचा अभ्यासक्रम सुरु झाला आहे. या नवीन मंजूर कोर्सच्या प्रशिक्षणासाठी या वर्षीपासूनच प्रवेश देण्यात येणार असल्याचे संस्थेचे प्रभारी प्राचार्य श्री. प्रदीप मि. ढवळ यांनी सांगितले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या अभ्यासक्रमचा समावेश आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी यांच्यासाठी तो उपलब्ध असून २४ जागा आहेत. फकरोजीराव देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग येथे वर्ष२०२५-२६ पासून मेकॅनिक इलेट्रिक व्हेईकल या अभ्यासक्रमास मान्यता मिळाली असून, चालू वर्षापासून याचे प्रवेश सुरु झाले आहेत. दोडामार्ग येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मेकॅनिक इलेट्रिक व्हेईकल हा नवीन अभ्यासक्रम मंजूर झाला आहे. जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी यांनी या कोर्सचा लाभ घेण्याचे आवाहन प्र. प्राचार्य श्री. ढवळ यांनी केले आहे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com