जवानांसाठी विद्यार्थिनींनी बनवल्या राख्या

जवानांसाठी विद्यार्थिनींनी बनवल्या राख्या

Published on

जवानांसाठी विद्यार्थिनींनी
बनवल्या राख्या
रत्नागिरी, ता. ७ : देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महर्षी कर्वे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी राख्या तयार करून त्या जिल्हा सैनिक कार्यालयाकडे सुपूर्द केल्या. या उपक्रमाची संकल्पना महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहा कोतवडेकर यांची होती. त्यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेविकांनी राख्या तयार केल्या. या राख्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून सीमेवर तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचवल्या जातील. राख्या सुपूर्द करताना जिल्हा सैनिक कार्यालयाचे कल्याण संघटक अनिल मोरबाळे, सुनील कदम, कर्मचारी तसेच महाविद्यालयाच्या एनएसएस स्वयंसेविका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Marathi News Esakal
www.esakal.com