रॉय यांनी स्वदेशी उद्योगाचा पाया रचला
-rat७p१२.jpg-
P२५N८२७६७
मंडणगड : आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना प्रा. संदीप निर्वाण, इतर मान्यवर.
-----
रॉय यांनी स्वदेशी उद्योगाचा पाया रचला
प्रा. निर्वाण ः मुंडे महाविद्यालयात जयंतीनिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंडगणड, ता. ७ ः ‘अ हिस्टरी ऑफ हिंदू केमिस्ट्री’ या पुस्तकात प्राचीन भारतातील प्रगत ज्ञानाचे विवेचन करत वैज्ञानिक आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांनी स्वदेशी उद्योगाचा पाया रचला, असे प्रा. संदीप निर्वाण यांनी सांगितले.
लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे भारतीय रसायनशास्त्राचे जनक आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रा. निर्वाण उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर यांनी भूषवले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. मुकेश कदम, डॉ. संगीता घाडगे, डॉ. विनोदकुमार चव्हाण, प्रा. शरीफ काझी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप उपस्थित होते. प्रा. निर्वाण म्हणाले, भारतीय रसायनशास्त्राचे जनक म्हणून आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांना ओळखले जाते. त्यांनी भारतीय रासायनिक उद्योगाला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण काम करून स्वदेशी कंपन्या स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. रॉय यांना त्यांच्या विज्ञानातील भरीव योगदानामुळे ‘आचार्य’ ही पदवी तत्कालीन ब्रिटिश सरकारने बहाल केली. १८९६ मध्ये मर्क्युरस नायट्रेट या पदार्थाच्या शोधामुळे त्यांना जगभरात वैज्ञानिक म्हणून ओळख मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.