नानासाहेब शेट्येंचे कार्य प्रेरणादायी
-rat७p८.jpg-
२५N८२७४०
साखरपा ः (कै.) नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती पुरस्कार सुभाष लाड यांच्या हस्ते स्वीकारताना नारळमित्र चेतन नाईक.
----
नानासाहेब शेट्ये यांचे कार्य प्रेरणादायी
सुभाष लाड ः पुरस्कार वितरण सोहळ्यात गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ७ ः संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावचे थोर सुपुत्र (कै.) नानासाहेब शेट्ये यांचे कला, क्रीडा, शेती व शिक्षणक्षेत्रात केलेले निःस्वार्थी काम आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले.
साखरपा येथे आयोजित (कै.) नानासाहेब शेट्ये यांच्या ३२व्या स्मृतिदिनी विद्यार्थी गुणगौरव व पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, नानासाहेब शेट्ये हे राजकीय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांची नाळ समाजातील गरीब लोकांशी जोडली होती. निःस्वार्थी समाजसेवा हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी आजही कोणी भरून काढू शकलेलं नाही, हेच नानांचे श्रेष्ठत्व आहे. या प्रसंगी पंचक्रोशीतील सातवीतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी, पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थी, दहावीमध्ये सर्व शाळांतून प्रथम आलेले विद्यार्थी, कला आणि वाणिज्य शाखेत प्रथम आलेले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
चौकट
पुरस्कारांचे मानकरी
(कै.) नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती पुरस्कार वांझोळे गावचे निसर्ग व पर्यावरणरक्षक व ‘नारळमित्र’ म्हणून परिचित असलेले चेतन नाईक यांना देण्यात आला. संस्था पुरस्कार घाटीवळे पश्चिम विभाग मराठा संघ मुंबई या संस्थेला त्यांच्या ३० वर्षातील समाजाभिमुख उपक्रमांची नोंद घेऊन देण्यात आला. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व अडीच हजार रुपये असे होते.