कणकवलीत ‘कविता वर्षावासाच्या… कविता परिवर्तनाच्या!’ कार्यक्रम उत्साहात
kan82.jpg
82963
कणकवलीः येथील कविता वर्षावासाच्या कार्यक्रमात कविता वाचन करताना कवी महेश काणेकर, बाजूला जिल्ह्यातील इतर कवी, कवयित्री.
कणकवलीत ‘कविता वर्षावासाच्या… कविता परिवर्तनाच्या!’ कार्यक्रम उत्साहात
पाऊसगाणी आणि निवडक कवितांचे अभिवाचनः कवींनी कवितेतून दिला सामाजिक परिवर्तनाचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ८ः येथील सम्यक साहित्य संसदेच्यावतीने ‘कविता वर्षावासाच्या… कविता परिवर्तनाच्या!’ हा अनोखा साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम येथील एच.पी.सी.एल. सभागृहात उत्साहात पार पडला. मराठी साहित्यातील निवडक कवींच्या कवितांचे अभिवाचन, पाऊसगाण्यांची सुश्राव्य मैफल आणि निमंत्रित कवींचे काव्यवाचन अशा बहारदार सादरीकरणाने कार्यक्रम रंगला.
कार्यक्रमाच्या काव्यपीठावर संस्थेचे अध्यक्ष इंजि. अनिल जाधव, प्रमुख अतिथी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी-लेखक प्रा. प्रवीण बांदेकर, संस्थेचे कार्यवाह राजेश कदम, कवी विठ्ठल कदम, प्राचार्य सिद्धार्थ तांबे, इतिहास संशोधक सुनिल हेतकर, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, कवयित्री संध्या तांबे, कवी अरुण नाईक, मधुकर मातोंडकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ आंबेडकरी कवी आ. सो. शेवरे यांच्या कवितांवर आधारित ‘आ. सो. शेवरे: समग्र कविता’ या डॉ. श्रीधर पवार व अभय शेवरे संपादित पुस्तकाचे तसेच कवी सुनिल कांबळे (हेतकर) यांच्या ‘शिलालेख’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. महेश केळुसकर व प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते झाले. तथागत गौतम बुद्ध वर्षाऋतूत आपल्या भिक्खूंसमवेत मुक्काम करून विचारांची देवाणघेवाण करत असत. त्याच प्रेरणेवर आधारित हा कार्यक्रम कवी राजेश कदम व सिद्धार्थ तांबे यांच्या संकल्पनेतून, विठ्ठल कदम व संध्या तांबे यांच्या सहकार्यातून साकारला. त्यानंतर सुप्रसिद्ध नाट्यकलावंत अभय खडपकर, नाट्यकर्मी राजेंद्र कदम, गायक-संवादक सुदिन तांबे, शैलेश तांबे, श्रेयस शिंदे, प्रा. सीमा हडकर, प्रा. सुषमा हरकुळकर, अनुष्का तांबे, मयुरी पेडणेकर आदींनी पावसावर आधारित कवितांचे अर्थपूर्ण अभिवाचन केले.
पाऊसगाण्यांच्या मैफलीत गायक महेश काणेकर, अमृता घाडी, राजेश वाळके, राकेश मिठबावकर यांनी सुमधूर गायन केले. संगीत संयोजन संदेश रावले व संदेश तांबे यांनी केले.
काव्यवाचनात विठ्ठल कदम, सुनील कांबळे, अरुण नाईक, सिद्धार्थ तांबे, प्रा. मोहन कुंभार, संध्या तांबे, प्रा. पूनम गायकवाड, स्नेहा कदम, प्रा. सुचिता गायकवाड, दीपक तळवडेकर आदींनी सहभाग घेतला. यावेळी इंजि. अनिल जाधव यांनी वर्षावासाचे बुद्धकालीन महत्त्व विशद करून लोकशाही मूल्यांची रुजवणूक व विचारांचे आदानप्रदान आवश्यक असल्याचे सांगितले. सूत्रनिवेदन अभिनेते निलेश पवार यांनी, तर सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले. कार्यवाह राजेश कदम यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.