शेवग्यांच्या बियांचे वाटप

शेवग्यांच्या बियांचे वाटप

Published on

शेवग्यांच्या बियांचे
‘एनएसएस’तर्फे वाटप
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने ''एक पेड माँ के नाम'' उपक्रमाअंतर्गत शेवगा झाडाच्या १०० बियांचे वाटप केले. सोबत प्रत्येकाने एक रोपटे लावण्याची शपथ घेतली. गौरांग नामजोशी याने मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन, प्रा. सचिन सनगरे यांच्या हस्ते बीजवाटप केले. प्रत्येकाने आपल्या परिसरात पर्यावरणस्नेही असले पाहिजे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या उपक्रमास शुभेच्छा देऊन स्वयंसेवकांना प्रेरित केले. उपक्रमाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक गुरुराज घाटकर, रिया कुळ्ये, आदिती कुळ्ये, पूर्वा चव्हाण यांनी नियोजन केले.

ज्येष्ठासाठी विस्मृतीचे
आजार शिबिर
रत्नागिरी ः रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित इंटरनॅशनल लॉन्जेव्हीटी सेंटर इंडिया (पुणे) यांच्यावतीने व घरडा केमिकलच्या सहकार्याने विस्मृतीचे आजार आणि डिमेन्शिया या आजारासंबंधित शिबिर नुकतेच झाले. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी परिचय करून दिला. जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रमोद शाक्य यांनी ज्येष्ठांमध्ये आढळणारे विस्मृतीचे आजार आणि डिमेन्शिया या आजाराची लक्षणे, घ्यावयाची काळजी व उपाय याबाबत माहिती दिली. इंटरनॅशनल लॉन्जेव्हीटी सेंटर इंडिया यांच्यावतीने यशोदा पाध्ये (रिसर्च कॉर्डिनेटर) यांनी ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्रपणे चाचणी घेऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ४० ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. इंटरनॅशनल लॉन्जेव्हीटी सेंटर इंडिया पुणे येथून सुशांत सोनवणे (कार्यक्रमाधिकारी), नंदकुमार सकट (तंत्र साहाय्यक उपस्थित होते.


rat८p९.jpg ः
२५N८२९७७
साखरपा ः एकल महिला पालकांशी संवाद साधताना चक्रभेदीच्या वैदेही सावंत.

एकल महिला पालकांच्या पाल्यांना
चक्रभेदीतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
साखरपा ः चक्रभेदी सोशल फाउंडेशन देवरूखतर्फे परिसरातील निराधार, गरजू, विधवा आणि एकल महिलांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. परिसरातील अशा ३५ विद्यार्थ्यांना हा लाभ देण्यात आला. देवरूख येथील चक्रभेदी सोशल फाउंडेशन ही संस्था विधवा आणि एकल महिलांच्या प्रश्नांसंबंधी कार्यरत आहे. या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी ही संस्था काम करते तसेच अशा महिलांच्या पाल्यांना शिक्षणात मदत व्हावी या उद्देशाने संस्थेतर्फे नुकताच एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यातून अशा ३५ विद्यार्थ्यांना गणवेश, छत्री, दप्तर, वह्या, कंपास असे साहित्य वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा वैदेही सावंत, सल्लागार रावसाहेब चौगुले, आश्लेषा इंगवले, प्रज्वल राऊत, वैदेही किरवे, गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, डी. आर. कदम आदी उपस्थित होते.

rat८p१०.jpg ः
२५N८२९७१
साखरपा ः कीर्तन सादर करताना अमृता नवाथ्ये.

नाणीज विद्यालयात कीर्तन कार्यक्रम
साखरपा : माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय नाणीज येथे नुकत्याच एका कीर्तनसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. अमृता नवाथ्ये यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे कीर्तनातून उद्बोधन केले. विद्यालयाच्या समाजशास्त्र विषय समितीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावेत या उद्देशाने हे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. विषय समिती प्रमुख शिक्षक पवार यांनी हे कीर्तन आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मुख्याध्यापिका सावंतदेसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कीर्तनकार अमृता नवाथ्ये यांनी कीर्तनातून संस्कारांचे महत्त्व विषद केले. त्यांना हार्मोनियमसाथ स्वप्नील परपते यांनी तर तबलासाथ कलाशिक्षक रवींद्र परपते यांनी केली. मृदंगसाथ अनंत साळवी यांची होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघरे यांनी केले तर माने यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com