शेतकऱ्यांना ''बायोगॅस'' उपलब्ध करा

शेतकऱ्यांना ''बायोगॅस'' उपलब्ध करा

Published on

82985

शेतकऱ्यांना ‘बायोगॅस’ उपलब्ध करा
रश्मी नाईकः चेंदवणमध्ये रोटरीतर्फे महिलांना फळझाडे वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ः भविष्यात रोटरी क्लब ऑफ कुडाळ व इनरव्हील क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून चेंदवण-कवठी गावातील शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्प उपलब्ध करून व्हावेत, अशी अपेक्षा चेंदवण माजी उपसरपंच रश्मी नाईक यांनी केली. चेंदवण येथे आयोजित फळझाडे वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ३०० महिलांना ६०० फळझाडे वितरित करण्यात आली.
कुडाळ इनरव्हील क्लब व चेंदवण माजी उपसरपंच रश्मी नाईक यांच्या पुढाकारातून चेंदवण-कवठी गावातील ३०० महिलांना ६०० फळझाडेरोप वितरण कार्यक्रम श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे झाला. यावेळी कुडाळ इनरव्हील क्लब अध्यक्षा सानिका मदने, चेंदवण माजी उपसरपंच रश्मी नाईक, कुडाळ रोटरी क्लब अध्यक्ष राजीव पवार, इनरव्हील क्लबच्या शिल्पा बिले, ऋतुजा परब, स्वप्नाली साळगावकर, पद्मा वेंगुर्लेकर, सोनल आजगावकर, राजश्री सावंत, चेंदवण पोलिसपाटील शुभश्री शृंगारे, रोटरी क्लब ऑफ कुडाळ असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने, गजानन कांदळगावकर, राजन बोभाटे, दिनेश आजगावकर, डॉ. संजय केसरे, शशिकांत चव्हाण, मुख्याध्यापक माणिक पवार व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत सदस्या विजयश्री मेस्त्री, चेंदवण स्त्री शक्ती ग्रामसंघ रश्मी नाईक, दीक्षा ठुंबरे (सीआरपी), सानवी चेंदवणकर, राजेशाही ग्राम संघ सायली नाईक, सीआरपी रेवती तोरसकर, समृद्धी ग्रामसंघाच्या विजयश्री मेस्त्री, सीआरपी साक्षी नाईक, घे भरारी ग्रामसंघ कवठीच्या सेजल बांदेकर, साक्षी जोशी, साक्षी  मेस्त्री आदी उपस्थित होते.
सानिका मदने यांनी, रविशंकर डोकोजू फाउंडेशन बंगळूरच्या ‘डोकोजू धन्यवाद’ उपक्रमांतर्गत ६०० फळझाडे रोपांचे वितरण उपक्रम चेअरमन गजानन कांदळगावकर व राजन बोभाटे यांच्या सहकार्यातून झाले. कुडाळ इनरव्हील क्लबने हा कार्यक्रम माजी उपसरपंच सौ. नाईक यांच्या पुढाकारातून यशस्वी करू शकला, असे सांगितले. रश्मी नाईक यांनी वितरित केलेली फळझाडे उत्तमपणे जगविलेल्या महिलांचा विशेष बक्षीस देऊन गौरव करणार असल्याचे सांगितले. फळझाडांमध्ये सुपारी, लिंबू, दालचिनी आदी झाडांचा समावेश होता. महिलांच्या वतीने सानिका मदने, राजीव पवार, डॉ. संजय केसरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com