लोकशाही निवडणूक प्रक्रिया जाणून घ्या
82988
लोकशाही निवडणूक प्रक्रिया जाणून घ्या
उमेश गाळवणकर ः कुडाळ नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ८ ः आजची युवा पिढी उद्याच्या परिपूर्ण भारताचे भक्कम आधारस्तंभ आहे. लोकशाही व्यवस्थेतील निवडणूक प्रक्रिया जाणून घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केले.
येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये ‘मतदान’ प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या उद्देशाने विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची निवडणूक प्रक्रिया राबविली. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया अनुभवली. सुरुवातीला निवडणूक प्रक्रिया सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. अर्ज कसा भरावा, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया, आपण वर्षभरामध्ये शाळेसाठी कोणकोणत्या गोष्टी करणार आहोत त्याबद्दलचा कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचविणे, संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान पाळावयाची आदर्श आचारसंहिता याबद्दलची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून रोहिदास राणे यांनी समजावून सांगितली. शिक्षिका अश्विनी परब यांनी आदर्श लोकशाहीची संकल्पना स्पष्ट केली. निवडणूक अधिकारी शिक्षिका अश्विनी परब, अदिती घाडी व शिक्षक मयुरेश लाड यांनी मतदान प्रक्रियेतील जबाबदारी चोखपणे पार पाडली. सर्व मतदार अर्थात विद्यार्थी आपापल्या वर्गाप्रमाणे रांगेत प्रतीक्षेत उभे होते. निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रत्येक मतदार विद्यार्थ्याची खातरजमा करण्यात आली. प्रत्येकाच्या बोटावर शाई लावली जात होती. त्यानंतर प्रत्येकाला एकूण तीन मतपत्रिका निवडणूक अधिकारी यांच्याकडून देण्यात आल्या.
विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, क्रीडामंत्री यासाठी मतदान प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका चित्रा कुंटे, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका प्रीती म्हाडदळकर यांनी सहकार्य केले. ज्येष्ठ शिक्षक रोहिदास राणे, विश्वजित डांगमोडेकर, मयुरेश लाड, पूर्णिमा साटम, प्राजक्ता मेस्त्री यांनी विशेष मेहनत घेतली. मुख्याध्यापिका चैताली बांदेकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.